Plane Crash : नगर : गुजरातमधील (Gujarat) अहमदाबाद इथे एअर इंडिया (Air India) च्या विमानाचा भीषण अपघात (Plane Crash) झाला असून, गुजरातमधीलच मेघानीनगर (Meghani Nagar) ह्या नागरी वस्तीत हे विमान कोसळलं. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. विमानातून 10 क्रू मेंबरसह तब्बल 242 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. जिथे प्लेन क्रॅश झालं, त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचं दिसून येत होते. घटनास्थळी विविध बचाव पथक दाखल झाले आहेत. मात्र, या दुर्घटनेत मोठी जिवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नक्की वाचा : ‘देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत’,ठाण्यातील बॅनरची राज्यभर चर्चा
काही मिनिटांतच कोसळलं विमान
गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली असून तब्बल 242 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळलं आहे. एअर इंडियाचं ह्या विमानाने अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केले होते. मात्र, दुपारी 1.38 वाजता केलेल्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान खाली कोसळलं. या दुर्घटनेनंतर काही वेळातच 3 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सध्या, एनडीआरएफचे पथक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.
अवश्य वाचा : ‘दिवा विझताना मोठा होतो,तसं जयंत पाटलांचं झालंय’- गोपीचंद पडळकर
अपघातानंतर दुर्घटनास्थळी मोठा स्फोट (Plane Crash)
अहमदाबादहून लंडनला म्हणजेच दूर मार्गावर जाणार असल्याने या विमानात इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आलं होतं, त्यामुळे अपघातानंतर दुर्घटनास्थळी मोठा स्फोट झाला. विमानातील प्रवाशांची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. विमान दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन माहिती घेतली, तसेच सर्वोतोपरी मदतीचे आश्वासनही दिले.