Plane Crash : पुन्हा दोन विमानांचे आपत्कालिन लँडिंग

Plane Crash : पुन्हा दोन विमानांचे आपत्कालिन लँडिंग

0
Plane Crash : पुन्हा दोन विमानांचे आपत्कालिन लँडिंग
Plane Crash : पुन्हा दोन विमानांचे आपत्कालिन लँडिंग

Plane Crash : नगर : गुजरातमधील विमान अपघातानंतर (Plane Crash) हवाई वाहतूक सेवेला लागलेले शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाहीये. स्पाइसजेटचे (SpiceJet) विमानही उड्डाणानंतर 10 मिनिटांनी परतले. हे विमान हैदराबादहून तिरुपतीला जात होते. विमानात एकूण 80 प्रवासी होते. याशिवाय दिल्लीहून लेहला जाणारे इंडिगोचे (IndiGo) विमान 6E 2006 आज (19 जून) गुरुवारी सकाळी तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीला परतले. विमानात क्रू मेंबर्ससह 180 लोक होते. बुधवारी यापूर्वी एअर इंडियाच्या (Air India) 3 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यामध्ये दिल्ली-बाली, टोरंटो-दिल्ली आणि दुबई-दिल्ली उड्डाणे यांचा समावेश होता.

Plane Crash : पुन्हा दोन विमानांचे आपत्कालिन लँडिंग
Plane Crash : पुन्हा दोन विमानांचे आपत्कालिन लँडिंग

नक्की वाचा : बापरे! कोल्हापूरातील धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या

प्रवाश्यांना होतोय मनस्ताप

ऐनवेळी विमान रद्द झाल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे. तसेच त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टोरंटोहून दिल्लीला जाणारे विमान AI188 रद्द करण्यात आले. प्रवासी आधीच विमानात चढले होते, त्यांना उतरवण्यात आले. विमानाच्या देखभालीमुळे आणि क्रूच्या उड्डाण कर्तव्य वेळेच्या मर्यादेमुळे ते रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दुबईहून दिल्लीला जाणारे विमान AI996 तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आले. प्रवाशांनी आधीच या विमानात चढून प्रवास केला होता. आदेश मिळताच त्यांनाही उतरवण्यात आले. दिल्लीहून बालीला जाणारे विमान AI2145 मध्यमार्गी दिल्लीला परतले. बाली विमानतळाजवळ ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याच्या वृत्तामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे एअरलाइनने म्हटले आहे.

Plane Crash : पुन्हा दोन विमानांचे आपत्कालिन लँडिंग
Plane Crash : पुन्हा दोन विमानांचे आपत्कालिन लँडिंग

अवश्य वाचा : निराधार बालकांना आधार कार्ड मिळणार

एअर इंडियाची अनेक उड्डाणे रद्द (Plane Crash)

DCGA ने म्हटले आहे की विमानाची देखभाल सध्याच्या सुरक्षा नियमांनुसार असल्याचे आढळून आले. एअर इंडियाच्या ताफ्यात 33 बोईंग 787- 8/9 विमाने आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मंगळवारी सांगितले होते की 12 ते 17 जून दरम्यान एअर इंडियाने बोईंग 787 विमानांसह 66 उड्डाणे रद्द केली. DCGA ने म्हटले आहे की- 12 जूनच्या घटनेनंतर, एअर इंडियाच्या बोईंग 787 मालिकेतील ड्रीमलाइनरची चौकशी करण्यात आली, ज्यामध्ये सुरक्षिततेबाबत कोणतीही मोठी समस्या आढळली नाही. मंगळवारी डीजीसीएने एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये डीजीसीएने एअरलाइनला विमान सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याचे, उड्डाण ऑपरेशन्स कडक करण्याचे आणि वेळेवर उड्डाणांचे वेळापत्रक निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.