Plantation : चंदनापुरी घाटात ५००० झाडांचे वृक्षारोपण

Plantation : चंदनापुरी घाटात ५००० झाडांचे वृक्षारोपण

0
Plantation : चंदनापुरी घाटात ५००० झाडांचे वृक्षारोपण
Plantation : चंदनापुरी घाटात ५००० झाडांचे वृक्षारोपण

Plantation : संगमनेर: ग्लोबल वार्मिंगच्या (Global Warming) समस्येवर मात करण्यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (Sahakar Maharshi Bhausaheb Thorat) यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियान अंतर्गत थोरात कारखान्याच्या वतीने चंदनापुरी घाटात ५००० विविध झाडांचे आज रोपण करण्यात आले. तर गावागावांसह तालुक्यातील तीन घाटात व अकरा डोंगरांवर विविध सहकारी संस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण (Plantation) व संगोपन करण्यात येत असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख दुर्गा तांबे (Durga Tambe) यांनी दिली आहे. चंदनापुरी घाटात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने १९ व्या दंडकारण्य अभियानांतर्गत विविध ५००० झाडांचे रोपण करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

नक्की वाचा : नगर-मनमाड रस्त्यावरील वाहतुकीत बदल; आदेश जारी

यावेळी बोलताना तांबे म्हणाल्या,

 आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकारण्य अभियानाचे हे एकोणिसावे वर्ष आहे. या अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावागावात मोकळ्या जागेत वृक्षारोपण सुरू आहे. या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी त्या स्थानिकांवर देण्यात आली आहे. तर तालुक्यातील शिखर संस्थांच्या वतीने तालुक्यातील विविध अकरा डोंगरांवरती वृक्षारोपण केले जात असून संवर्धन व संगोपन केले जात आहे. तसेच आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाट , कऱ्हे घाट, कोची घाट या घाटांमध्ये वृक्षारोपणासह दरवर्षी रस्त्यांच्या दुतर्फा रंगीबेरंगी फुलांचे रोपण करण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा परिसर अत्यंत सुंदर दिसतो.

Plantation : चंदनापुरी घाटात ५००० झाडांचे वृक्षारोपण
Plantation : चंदनापुरी घाटात ५००० झाडांचे वृक्षारोपण

अवश्य वाचा : आरक्षणाचे खरे शत्रू काेण?; शरद पवारांचे नाव न घेता मंत्री विखेंची टीका

रस्त्यांच्या दुतर्फा विविध रंगीबेरंगी फुलांचे रोपण करणार (Plantation)

यावर्षीही या घाटांमधील रस्त्यांच्या दुतर्फा विविध रंगीबेरंगी फुलांचे रोपण करण्यात येणार आहे. तर बाबा ओहोळ म्हणाले, पर्यावरण संवर्धनाचे दंडकारण्य अभियान ही संगमनेर तालुक्याची लोक चळवळ आहे. वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली असून गावा गावच्या शिवारांमधून हिरवी झाडे दिसू लागली आहेत. प्रत्येकाने दरवर्षी किमान दोन झाडे लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here