Plantation : कर्जतमध्ये बुधवारी महावृक्षारोपण

Plantation : कर्जतमध्ये बुधवारी महावृक्षारोपण

0
Plantation : कर्जतमध्ये बुधवारी महावृक्षारोपण
Plantation : कर्जतमध्ये बुधवारी महावृक्षारोपण

Plantation : कर्जत : स्वच्छ कर्जत, सुंदर कर्जत आणि हरित कर्जतसाठी झटणाऱ्या सर्व सामाजिक संघटनेच्या स्वच्छता आणि वृक्षसंवर्धन (Tree Conservation) कार्यास बुधवार, दि २ ऑक्टोबर रोजी चतुर्थ वर्ष (१ हजार ४६० दिवस) पूर्ण होत असून या दिवशी सकाळी ७ वाजता बायोडाव्हर्सिटी येथे महावृक्षारोपण (Plantation) पार पडणार आहे. तसेच दुपारी ३ वाजता शारदाबाई पवार सभागृहात ध्येयवेडे श्रमप्रेमी यासह पर्यावरण संवर्धनासाठी (Environmental Conservation) योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तीचा सन्मान सोहळा पार पडणार आहे.

Plantation : कर्जतमध्ये बुधवारी महावृक्षारोपण
Plantation : कर्जतमध्ये बुधवारी महावृक्षारोपण

नक्की वाचा: मतदानाचा दिवशी ज्या संस्था सुट्टी देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचे निवडणूक आयुक्तांचे आदेश

२ ऑक्टोबर २०२० साली अभियानाची सुरुवात

२ ऑक्टोबर २०२० रोजी महात्मा गांधी जयंतीपासून सर्व सामाजिक संघटनेच्या श्रमप्रेमीनी आपले स्वच्छतेचे कार्य एक छोटेसे रोपटे घेत सकाळी ६:३० ते ७:३० सुरू केले. पाहता-पाहता त्याचे रूपांतर मोठ्या वटवृक्षात झाले. कर्जत शहर, उपनगर आणि परिसरातील लहान-लहान गावांमध्ये जात किळसवाणे, घाणेरडा परिसर अवघ्या काही वेळातच चकाचक करीत स्वच्छता अभियान राबवले. त्या जागेत हजारो देशी वृक्षाची लागवड केली. विशेष म्हणजे हे सर्व सामजिक संघटनेचे श्रमप्रेमी कोणतेही अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य म्हणून पार पाडतात.

अवश्य वाचा: मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात’या’जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा अंदाज

रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण (Plantation)

याच कार्याने कर्जत नगरपंचायत हद्दीत ५ मियावाकी घन-वन प्रकल्प, विविध प्रभागात मोकळ्या जागेत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, त्यास संरक्षक जाळी लावत त्याची निगा राखणे, कर्जत-वालवड रोडला वडाची लागवड करीत वड रोडची संकल्पना अंमलात आणली. पर्यावरण पूरक सायकल रॅली आयोजित केली. याच कार्याने कर्जत नगरपंचायतीस माझी वसुंधरा स्पर्धा २ मध्ये प्रथम तर पहिल्या स्पर्धेत द्वितीय स्थान पटकावले होते. यासह आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत कर्जतचा डंका राज्यासह, देशात आणि सातासमुद्रापार देखील नेण्यात मोलाचा वाटा घेतला. मागील वर्षी इजिप्तमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाची सर्वोच पातळीवरील जागतिक पर्यावरण बदल परिषदेत कर्जतच्या श्रमप्रेमीची चित्रफीत दाखविण्यात आली होती.

बुधवारी या कार्यास चार वर्षे पूर्ण होत असून याच दिवसाचे औचित्य साधत सकाळी ७ वाजता बायोडाव्हर्सिटी येथे महावृक्षारोपण तर दुपारी ३ वाजता शारदाबाई पवार सभागृहात ध्येयवेडे श्रमप्रेमी यासह पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तीचा सन्मान सोहळा पाणी फाऊंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत येसूबाईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये तसेच राजकीय पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या हजेरीत रंगणार आहे. याचा लाभ सर्व कर्जतकरांनी घ्यावा, असे आवाहन सर्व सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आले.