Plastic Surgery : नगर : भारतीय जैन संघटना (Bhartiya Jain Sanghatana) अहिल्यानगर, श्री चांदमल मुनोत नेवासकर पब्लिक ट्रस्ट व जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. पद्मश्री डॉ. शरदकुमार दिक्षित (America) यांच्या स्मरणार्थ १६ ते १७ जानेवारी दरम्यान अहिल्यानगर येथील आयुष हाॅस्पिटल (AYUSH Hospital) येथे मोफत प्लास्टिक सर्जरी (Plastic Surgery) शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चांदमल मुनोत ट्रस्टचे ट्रस्टी किशोर मुनोत यांनी दिली.
नक्की वाचा : रस्ते अपघातातील जखमींना मिळणार कॅशलेस उपचार,नितीन गडकरींची घोषणा
महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार
भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आदेश चंगेडिया, प्रशांत गांधी यावेळी उपस्थित होते. या शिबिरामध्ये मुख्यत्वे करून दुभंगलेले ओठ, चेहऱ्यावरील विद्रूप वर्ण व डाग, नाक व कान यावरील बाह्य व्यंग, पापण्यातील विकृती अशा प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहेत. या उपक्रमास २२ वर्ष पूर्ण झाले आहेत. प्लास्टिक सर्जरी अतिशय महागडी असते. हीच बाब लक्षात घेऊन या मोफत शिबिराचा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. स्व. शरदकुमार दिक्षित (अमेरिका) यांच्या समरणार्थ त्यांचेच शिष्य डॉ. राज लाला, ललिता लाला अमेरिकेतून नगरला येतात व त्यांचे सहकारी भारती विद्यापीठाचे डॉ. अमित बसन्नवार व अहिल्यानगरच्या डॉ मृदुला रवींद्र मुळे हे हा मानवतेचा महायज्ञ चालवत आहेत. त्यामुळे अनेकांच्या जीवनात नवीन आनंद फुलण्यास मदत होत आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगरमध्ये तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन
शिबिरात २०० ते ३०० रुग्णांची मोफत तपासणी (Plastic Surgery)
या शिबिरात नगर येथील डॉ. नूतन फिरोदिया, डॉ. दीपा भळगट, डॉ. सागर पटवा हे शिबीर सहप्रमुख म्हणून शिबिरात सहकार्य करणार आहेत. या शिबिरात २०० ते ३०० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. शिबिरासाठी रुग्ण नोंदणी व तपासणी गुरुवार (ता.१६) या वेळेस जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस आयुष बिल्डिंग, तारकपूर रोड येथे होणार आहे. उर्वरित वेळात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. जानेवारी २०२५ मध्ये १३ मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरे होत आहेत. डॉ. राज लाला मार्फत सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि गोंदिया या ठिकाणी तसेच डॉ. लॅरी वानस्टाईन मार्फत पुणे, रायपूर, नाशिक, संगमनेर, जळगाव, बेळगावी आणि दिल्ली या ठिकाणी भारतीय जैन संघटने मार्फत घेत आहेत, अशी माहिती शशिकांत मुनोत यांनी दिली.