PM-Kisan Samman Nidhi : नगर : पीएम किसान सन्मान निधी (PM-Kisan Samman Nidhi) योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी (Namo Shetkari Yojana) या योजनांचा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते शनिवार (ता. ५) सकाळी १० वाजता वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता. मानोरा) येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
नक्की वाचा: श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकादमीतून भारतासाठी क्रिकेटपटू मिळतील : रोहित शर्मा
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली माहिती
या समारंभास राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ -वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
अवश्य वाचा: अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारा जेरबंद
जवळपास १.२० कोटी शेतकऱ्यांना लाभ (PM-Kisan Samman Nidhi)
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी २०१९ पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास रुपये २ हजार प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रुपये सहा हजार त्यांच्या बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२४ अखेर राज्यातील जवळपास १.२० कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर एकूण १७ हप्त्यांमध्ये सुमारे रुपये ३२ हजार कोटीचा लाभ जमा झालेला आहे.
पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात सन २०२३-२४ पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेच्या १४ व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने २०२३-२४ व २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये एकूण ९१.४५ लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रुपये ६९४९.६८ कोटी लाभ अदा करण्यात आला आहे. जून २०२३ पासून आयोजित गावपातळीवरील विशेष मोहिमांद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची २० लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांची संख्या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहे.