PM Modi : नगर : लाेकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) सर्वच पक्षांनी जाेरदार तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा समाज दिवसेंदिवस आक्रमक हाेत आहे. मराठा समाजाने राज्यातील अनेक मतरासंघात प्रत्येक गावातून दाेन उमेदवार उभा करण्याच्या तयारी केली आहे. उमेदवारीवरुन प्रत्येक जिल्ह्यात बैठकाही पार पडल्या आहे. दरम्यान, आता परभणीतील बैठकीत मराठा समाजाकडून महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. मराठा समाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याविरोधातच आता दंड थाेपटले आहे. कारण वाराणसी मतदारसंघात देखील परभणीतील मराठा समाज एक हजार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहे. याबाबत मराठा समाजकडून ठराव मंजूर करण्यात आला.
हे देखील वाचा: मुकादमावर पूर्व वैमनस्यातून जीवघेणा हल्ला करणारे आरोपी जेरबंद
राजकारणासाठी गावबंदी पाठोपाठ घरबंदी ठराव मंजूर (PM Modi)
परभणी शहरातील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात नुकतीच परभणीतील मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला विविध संघटनाचे पदाधिकारी, मराठा बांधव मोठ्या संख्येने उपास्थित होते. यावेळी जिल्ह्यातून एक हजार मराठा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकल मराठा समाजाकडून आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी परभणीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. वाराणसी पाठोपाठ राहुल गांधी, बारामती आणि ठाणे या चार मतदार संघात मराठा समाज बांधव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. येणाऱ्या दिवसात राजकारणासाठी गावबंदी पाठोपाठ घरबंदी करण्याचा ठराव ही मंजूर करण्यात आला आहे.
नक्की वाचा: आता ऑनलाईन घोटाळ्यांना बसणार आळा; भारत सरकारकडून ‘चक्षु’ पोर्टल लॉन्च
सगेसोयरे दाखल्यांची अंमलबजावणीची मागणी (PM Modi)
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सगेसोयरे दाखल्यांची अंमलबजावणी झाला नाही, तर प्रत्येक मतदारसंघात २ हजार उमेदवार देणार, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच नाही, तर राहुल गांधी, सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात देखील मराठा समाज उमेदवार देणार आहे.