Gaganyaan Mission: गगनयान मोहिमेतील चार अंतराळवीरांची नावे आली समोर!

इस्रोच्या गगनयान मोहीमेतील एक मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ दौऱ्यादरम्यान केली आहे. या अवकाश यानातून अवकाशात जात पृथ्वी भ्रमंती करणाऱ्या चार अंतराळवीरांची नावे जाहिर करण्यात आली आहेत.

0
Gaganyaan Mission
Gaganyaan Mission

नगर : इस्रोच्या (ISRO) आगामी गगनयान मोहीमेतील एक मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केरळ दौऱ्यादरम्यान केली आहे. या अवकाश यानातून अवकाशात जात पृथ्वी भ्रमंती करणाऱ्या चार अंतराळवीरांची नावे जाहिर करण्यात आली आहेत.

प्रशांत बाळकृष्ण नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशु शुक्ला अशी ही चार नावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ दौऱ्यात या चार अंतराळवीरांची नावे जाहिर करत त्यांना अंतिम तयारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चारही जणांना एस्ट्रोनॉट विंग्स म्हणजेच अंतराळवीर पंख देऊन जगासमोर सादर केले.

नक्की वाचा : एसआयटी चौकशीच्या आदेशावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया  

भारतीय अंतराळवीर स्वबळावर अवकाशात पाठवले जाणार (Gaganyaan Mission)

गनयान मोहीमेअंतर्गत भारतीय अंतराळवीर स्वबळावर अवकाशात पाठवले जाणार आहेत. हे चारही भारतीय वायू दलाचे अधिकारी आहेत. या चौघांबद्दल विशेष माहिती अशी की, देशातील सर्व प्रकारची लढाऊ विमाने त्यांनी उडवली आहेत. बंगळूरु इथे अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी खास सुविधा तयार करण्यात आल्या आहे. एवढंच नाही तर रशियामध्येही या चार जणांनी काही काळ अंतराळवीरासाठी आणि अवकाश प्रवासासाठी आवश्यक ते प्राथमिक प्रशिक्षण घेतले आहे. येत्या काळात अमेरिकेची नासाही इस्रोला मदत करणार आहे. या मोहिमेत सुमारे सहा टन वजनाचे अवकाश यान अवकाशात पाठवले जाणार आहे. हे अवकाश यान पृथ्वीपासून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर तीन दिवस प्रदक्षिणा घालेल, असे गगनयान मोहीमेच्या पहिल्या समानवी मोहीमेचे नियोजन असणार आहे.

अवश्य वाचा : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मराठी भाषा गौरव दिवसाची पोस्ट चर्चेत

राकेश शर्माने मिळविला होता पहिला अंतराळवीर होण्याचा मान  (Gaganyaan Mission)

या आधी एप्रिल १९८४ ला राकेश शर्मा यांनी तेव्हाच्या सोव्हिएत रशियाच्या Soyuz T-11 या यानातून अवकाश भ्रमंती करत भारताचे पहिले अंतराळवीर होण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांच्यासह काही भारतीय वंशाच्या नागरिकांनी अन्य देशांचे प्रतिनिधी अंतराळवीर म्हणून अवकाश वारी केली. मात्र तरीही आत्तापर्यंत भारताने स्बळाबळावर भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवला नव्हता. मात्र आता देशाचे हे चार अंतराळवीर २०२५ च्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला गगयनान मोहीमेतून अवकाश भ्रंमती करणार आहेत.

हेही पहा : मुख्यमंत्री साहेब! ही धमकी आहे का? उद्या जर जरांगे पाटलांचा जीव गेला, तर मुख्यमंत्री जबाबदार असणार का? काँग्रेस पक्षाचे ट्विट चर्चेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here