PM Modi In Wayanad:पंतप्रधान मोदी वायनाडमध्ये दाखल;भूस्खलनग्रस्त भागाची केली पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमध्ये पोहोचत भूस्खनल प्रभावित क्षेत्रांची हवाई पाहणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन होते.

0
PM Modi In Wayanad
PM Modi In Wayanad

PM Modi : केरळमधील वायनाड (Waynad) जिल्ह्यात झालेल्या भुस्लखनामुळे (Landslide)अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. वायनाडमधील काही गावांमध्ये ३० जुलै रोजीही घटना घडली होती. या दुर्घटनेत ३०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू तर शेकडो नागरिक जखमी झाले होते. या घटनेनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केरळमध्ये पोहोचत भूस्खनल प्रभावित क्षेत्रांची हवाई पाहणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन होते.

नक्की वाचा : “मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देणार”;देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

नरेंद्र मोदींनी वायनाडच्या भूस्खलनग्रस्त भागाची केली प्रत्यक्ष पाहणी (PM Modi In Wayanad)

पंतप्रधान नरेंद्र मोदी वायनाडच्या कल्पेट्टा येथे दाखल झाले. तेथून आज ते कन्नौरमध्ये गेले. त्यानंतर ते भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने केरळच्या वायनाड जिल्ह्याकडे रवाना झाले. नरेंद्र मोदींनी भूस्खलन ग्रस्त चूरलमाला, मुंडक्काई आणि पंचिरिमत्तम गावांची हवाई पाहणी केली. त्यांच्यासोबत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि केंद्रीय पर्यटन, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी उपस्थित होते. नरेंद्र मोदींनी हवाई पाहणी केल्यानंतर भूस्खलन ग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी येथील बचाव कार्याची माहिती घेतली.

अवश्य वाचा : मराठी सिनेसृष्टीवर शोककळा;ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन

वायनाडमध्ये अनेक जणांचा मृत्यू (PM Modi In Wayanad)

३० जुलै रोजी वायनाडच्या चूरलमाला आणि मुंडक्काईला येथे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले होते. या दुर्घटनेमध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण बेपत्ता झाले आहेत. दरम्यान, केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला वायनाडमधील भूस्खलन राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे. संसदेच्या अधिवेशनातही वायनाडमधील भूस्खलनाचा मुद्दा चर्चेला आला होता. दरम्यान, काँग्रेस नेते आणि वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही यापूर्वी वायनाडचा दौरा करुन तेथील परिस्थितीची पाहणी केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी भेट घेवून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here