PM Narendra Modi : नगर तालुक्यातील ८८ रस्ते होणार खुले : संजय शिंदे

PM Narendra

0
PM Narendra : नगर तालुक्यातील ८८ रस्ते होणार खुले : संजय शिंदे
PM Narendra : नगर तालुक्यातील ८८ रस्ते होणार खुले : संजय शिंदे

PM Narendra Modi : नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) वाढदिवस ते महात्मा गांधी (Mahatma Gandhi) जयंतीपर्यंत सेवा पंधरवाडा राबविला जाणार आहे. या पंधरवाड्या अंतर्गत तालुक्यातील ८८ रस्ते अतिक्रमणमुक्त केली जाणार आहे. पुनर्वसनासह विविध कारणांनी शेतकऱ्यांना दिलेल्या वर्ग दोनच्या ९१३ गटातील १ हजार ६७५ शेतकऱ्यांना या जमिनी वर्ग एक करण्यासाठी सूचनापत्र पाठविले जाणार आहे. नऊ गावातील ८३ कुटुंबांना घरांसाठी शासकीय जमिनी दिल्या जाणार आहेत, अशी माहिती नगरचे तहसीलदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अवश्य वाचा : बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरु; प्रवास भाडे किती? जाणून घ्या सविस्तर…

सेवा पंधरवाडा तीन टप्प्यात राबविण्यात येणार

शेत रस्ते, पाणंद रस्त्यांसाठी १७ ते २२ या कालावधीत मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेसाठी तहसील प्रशासनाने तयारी केली आहे. गाव नकाशावरील ५६ तर वहिवाटीचे २७ रस्ते अतिक्रमणामुळे बंद झाल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत निष्पन्न झाले आहे. हे रस्ते अतिक्रमणमुक्त केले जाणार आहेत.

नक्की वाचा: ‘त्या’ नराधमावर कठोर कारवाई करावी; आमदार भरत गोगावले यांची प्रतिक्रिया

८३ कुटुंबांना शासकीय जमीन घरासाठी दिली जाणार (PM Narendra Modi)

सर्वांसाठी घरे (घरकुल) हा टप्पा २३ ते २७ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शाककीय जमिनीवर २०११ पूर्वी राहत असलेल्या आणि त्याबाबत पुरावे असणाऱ्या नऊ गावातील ८३ कुटुंबांना शासकीय जमीन घरासाठी दिली जाणार आहे. या अभियानाचा तिसरा टप्पा हा नाविण्यपूर्ण योजनाचा आहे. या प्रसंगी अतिरिक्त तहसीलदार स्वप्निल ढवळे, निवासी नायब तहसीलदार दळवी, नायब तहसीलदार अभिजित वांढेकर आदी उपस्थित होते.