नगर : मोदींना शिव्या देणं हाच काँग्रेसचा (Congress) अजेंडा असून ते विकसित भारताचे नावही घेत नाहीत, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. एखादा पक्ष घराणेशाही राजकारणाच्या दुष्टचक्रात अडकला की हेच घडते, अशी टीकाही मोदींनी केली. ते राजस्थानमधील (Rajasthan) विकसित भारत कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
नक्की वाचा : ‘मुख्यमंत्रीपदाचा निर्णय केवळ संख्याबळावर होणार नाही’- देवेंद्र फडणवीस
‘विकसित भारत-विकसित राजस्थान कार्यक्रमातुन मोदींचा संवाद (PM Narendra Modi)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ‘विकसित भारत-विकसित राजस्थान’कार्यक्रमातून १७ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकासकामांचे उद्घाटन केले. या प्रकल्पामध्ये रेल्वे, रस्ते, सौर ऊर्जा, पिण्याचे पाणी आणि नैसर्गिक वायू यांसारख्या विकासकामांचा समावेश आहे. विकासकामांचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी राजस्थानमधील जनतेला ऑनलाइन संबोधित केलं.
अवश्य वाचा : मराठा आरक्षणावर २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन; मुख्यमंत्री शिंदेंनी मांडली भूमिका
मोदींचा काँग्रेसमधील घराणेशाहीवर निशाणा (PM Narendra Modi)
यावेळी पंतप्रधान मोदींनी यांनी काँग्रेस नेत्यांना लक्ष करत त्यांच्यावर टीका केली. २०१४ पूर्वी देशभरात मोठमोठे घोटाळे होत होते. ठिकठिकाणी दंगली घडवल्या जात होत्या. तेव्हा आपल्या देशाचे काय होणार, असे अनेकांना वाटत होते. पण आज आपण विकसित भारत, विकसित राजस्थानबद्दल बोलत आहोत. मोदींना शिव्या देणं हाच काँग्रेसचा अजेंडा असून ते विकासकामांबद्दल बोलत नाहीत. त्यामुळेच आज सगळे काँग्रेस सोडत आहेत. आता काँग्रेसमध्ये एकच कुटुंब दिसत आहे, त्यांना भविष्याचा अंदाज येत नाही आणि भविष्याचा कोणताही रोडमॅप त्यांच्याकडे नाही, असं म्हणत मोदींनी काँग्रेसमधील घराणेशाहीवर निशाणा साधला.