PM Narendra Modi:पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले आदमपूर एअरबेसवर; जवानांशी साधला संवाद 

0
PM Narendra Modi:पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले आदमपूर एअरबेसवर;; जवानांशी साधला संवाद
PM Narendra Modi:पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले आदमपूर एअरबेसवर;; जवानांशी साधला संवाद

नगर : भारताने पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधात राबवलेले ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) यशस्वीपणे पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पंजाबच्या आदमपूर एअरबेसवर (Adampur Airbase) जवानांच्या भेटीला पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी जवानांशी संवाद साधत ऑपरेशन सिंदुरबाबत चर्चा केली आणि त्यांचे अभिनंदन देखील केले.

नक्की वाचा : दहावीचा निकाल जाहीर;महाराष्ट्रात मुलींनीच मारली बाजी    

पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसला भेट देणे खूप खास मानले जात आहे. याचे कारण म्हणजे, पाकिस्तानने हा एअरबेस उडवल्याचा दावा केला होता. मात्र आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे पोहोचल्यामुळे पाकिस्तानच्या खोट्या दाव्याची पोलखोल झाली आहे. पंतप्रधानांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या भेटीचे काही फोटोही शेअर केले आहेत.

अवश्य वाचा : आयपीएलचे नवीन वेळापत्रक जाहीर;’या’ दिवशी अंतिम सामना   

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले ?(PM Narendra Modi)

या बैठकीची माहिती देताना पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की,”आज सकाळी एएफएस आदमपूरला भेट दिली आणि आपल्या शूर हवाई योद्ध्यांची भेट घेतली. धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयतेचे प्रतीक असलेल्या जवानांसोबत वेळ घालवणे अतिशय खास अनुभव होता.आपल्या देशासाठी आपल्या सशस्त्र दलांनी जे काही केले आहे, त्यासाठी भारत नेहमीच त्यांचे आभारी राहील.”

भारतासाठी आदमपूर एअरबेस खास का ?(PM Narendra Modi)

पंजाबमधील आदमपूर एअरबेस हा भारतीय हवाई दलाच्या मिग -२९ विमानांचा तळ आहे. भारतातील सर्वांत मोठ्या लष्करी हवाई तळांपैकी आदमपूर एअरबेस हे दुसरं सर्वांत मोठं एअरबेस आहे. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात आदमपूर एअरबेसने खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. येथील स्क्वाड्रनला ब्लॅक आर्चर म्हणून ओळखले जाते. आदमपूर एअरबेस हे भारताच्या उत्तरेकडील सीमेजवळील मोक्याच्या हवाई संरक्षण ठिकाणांपैकी एक आहे. हे एअरबेस भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात आहे. चीन आणि पाकिस्तान दोन्ही आघाड्यांवर जलद प्रत्युत्तर देण्यासाठी हे ठिकाण महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आदमपूर एअरबेसला भेट केवळ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोरणात्मक नव्हती, तर ती सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी खूप महत्वाची होती.