नगर : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी (ता.१३) मतदान पार पडलं आहे. हा चौथा टप्पा पार झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी पाचव्या टप्प्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) हे देखील या टप्प्यासाठी सक्रिय झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी उद्या (ता.१५) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या कल्याण आणि नाशिकमध्ये जंगी सभा होणार आहेत. तसेच मुंबईत रोड शो (Mumbai Road Show) होणार आहे.
नक्की वाचा : राज्यात चौथ्या टप्प्यासाठी ११ मतदारसंघात ‘इतके’ मतदान
नरेंद्र मोदी १५ आणि १७ मे रोजी मुंबई दौऱ्यावर (PM Narendra Modi)
मुंबईतील उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १५ मे आणि १७ मे रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक मार्ग बंद राहणार आहेत. याबाबत मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांनी माहिती दिली आहे. मोदी उद्या कल्याण, भिवंडी, ठाणे लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारसाठी उद्या कल्याणमध्ये प्रचार सभा घेणार आहेत. त्याबरोबर नाशिकच्या पिंपळगावमध्येही त्यांची जाहीर सभा होणार आहे. तर मुंबईत रोड शो असणार आहे. या दौऱ्यासाठी आयोजकांनी जय्यत तयारी केली आहे.
अवश्य वाचा : कर्जत-जामखेडमध्ये सरासरी ६५ टक्के मतदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये जंगी सभा (PM Narendra Modi)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जंगी सभा कल्याणमध्ये होणार आहे. मोदींचे हेलिकॉप्टर हे बापगाव परिसरात उतरणार आहे. यासाठी हेली पॅड तयार करण्यात आले असून हेली पॅडला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींची जाहीर सभा आधारवाडी जेल समोरील मैदानात होणार आहे. या मैदानात ५० हजाराहून अधिक आसन व्यवस्था असणार आहे. तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे.
नरेंद्र मोदी यांचा उद्या मुंबईत रोड शो असल्यामुळे उद्या दुपारी दोन वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत मुंबईतील एल.बी.एस मार्ग बंद राहणार आहे. तसेच माहुल घाटकोपर रोडवरील मेघराज जंक्शन ते आर.बी कदम जंक्शन पर्यंत उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजूला वाहतूक दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडून संपूर्ण एल.बी.एस मार्ग व त्याला जोडणारा मुख्य रस्त्यापासून १०० मीटर अंतरापर्यंत १४ आणि १५तारखेला नो पार्किंग करण्यात आले आहे.