Narendra Modi:पाकिस्तानचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही;कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधानांचा दहशतवाद्यांना इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कारगिलमधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली.

0
Narendra Modi:पाकिस्तानचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही;कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधानांचा दहशतवाद्यांना इशारा
Narendra Modi:पाकिस्तानचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही;कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधानांचा दहशतवाद्यांना इशारा

Narendra Modi : देशभरात आज कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) साजरा केला जात आहे. या दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कारगिलमधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर (Pakistan) सडकून टीका केली. पाकिस्तानचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही, अशी ग्वाही देताना त्यांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांनाही इशारा दिला आहे.

नक्की वाचा : मोठी बातमी! यूपीएससीच्या परीक्षा प्रणालीत होणार बदल

‘देश आमच्या लष्कराच्या पराक्रमी महानायकांचा कायम ऋणी’ (Narendra Modi)

“कारगिल विजय दिवस आम्हाला सांगतो की,राष्ट्रासाठी दिलेलं बलिदान अमर होते. दिवस, महिने, वर्षे ,शतके जातात, परिस्थिती बदलते पण राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्यांची नावे कायम अमर राहतात. हा देश आमच्या लष्कराच्या पराक्रमी महानायकांचा कायम ऋणी आहे. हा देश त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे. माझं सौभाग्य आहे की, कारगिल युद्धाच्या वेळी मी देशाचा सामान्य नागरिक म्हणून आपल्या सैनिकांमध्ये होतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

अवश्य वाचा : तापसी पन्नूच्या ‘फिर आयी हसीन दिलरुबा’चा ट्रेलर प्रदर्शित’

“मला आठवतंय कशा पद्धतीने आमच्या लष्कराने एवढ्या उंचीवर, एवढं कठीण युद्ध ऑपरेशन लढलं होतं. मी देशाला विजयी करणाऱ्या अशा सर्व शूरवीरांना आदरपूर्वक प्रणाम करतो. मी शहीदांना नमन करतो की, ज्यांनी कारगिलमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं. कारगिलमध्ये आम्ही, फक्त युद्ध जिंकलं नव्हतं तर आम्ही सत्य, संयम आणि सामार्थ्याचा अद्भूत परिचय दिला होता”,असंही मोदींनी सांगितलं.

‘पाकिस्तानने आपल्या इतिहासातून काहीच धडा घेतला नाही’ (Narendra Modi)

मोदी म्हणाले की, पाकिस्तानने जेवढे दुप्रयास केले त्या सर्वांना चारी मुंड्या चीत केले. परंतु पाकिस्तानने आपल्या इतिहासातून काहीच धडा घेतला नाही. त्यांनी आतंकवाद्यांच्या सहाय्याने प्रासंगिक राहण्याचा प्रयत्न केला. आज मी जेव्हा त्या जागेतून बोलत आहे, जिथे दहशतवाद्यांना माझा आवाज थेट ऐकू जात आहे. मी दहशतवाद्यांना सांगू इच्छितो की, त्यांचे नापाक मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here