PM Narendra Modi :आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पंतप्रधानांचे देशवासियांना खुलं पत्र

निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक खुलं पत्र लिहिलं आहे. 'मेरे प्रिय परिवारजन' असं म्हणत मोदींनी पत्रामध्ये विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी लोकांकडून मतं मागवली आहेत.

0
PM Narendra Modi
PM Narendra Modi

नगर : देशभर लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. त्यातच आज निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊन आचारसंहिता (Code Of Conduct) लागू होणार आहे. मात्र निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक खुलं पत्र लिहिलं आहे. ‘मेरे प्रिय परिवारजन’ असं म्हणत मोदींनी पत्रामध्ये विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी लोकांकडून मतं मागवली आहेत.

नक्की वाचा : ‘आधी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा,मग निवडणुका जाहीर करा’- मनोज जरांगे

तुमचं सहकार्य काम मिळणार याचा विश्वास आहे -मोदी (PM Narendra Modi)

पत्रामध्ये मोदी यांनी लिहिले आहे की, माझ्या आणि तुमच्या नात्याला एक दशक पूर्ण झालं आहे. तुमचं सहकार्य आम्हाला कायम मिळणार, असा मला विश्वास आहे. राष्ट्र निर्माणासाठी आम्ही सातत्याने कष्ट घेत आहोत, ही मोदींची गॅरंटी आहे. देशातल्या १४० कोटी कुटुंबियांचा विश्वास, समर्थन यामुळे निर्माण झालेलं नातं विशेष आहे. या नात्याला शब्दामध्ये व्यक्त करणं अवघड आहे.

देशातील कुटुंबियांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणं, ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. शेतकरी, गरीब, युवक आणि महिलांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आमच्या सरकारने इमानदारीने काम केलं आहे. त्याचे परिणाम आज देशाला दिसून येत आहेत. त्यांनी पत्रामध्ये जीएसटी, कलम ३७०, तीन तलाख, महिलांसाठीचं नारी शक्ती वंदन विधेयक याविषयी माहिती दिली. याशिवाय आपल्या तिसऱ्या कार्यकाळासाठी लोकांकडून समर्थन आणि सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

हेही पहा : मोठी बातमी! राज्यातील शालेय शिक्षकांना आता ड्रेस कोड अनिवार्य

लोकशाहीचं सौंदर्य हे लोकसहभागात – मोदी (PM Narendra Modi)

भाजप आणि मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकीत ४०० जागा जिंगण्याचं लक्ष्य ठेवले आहे. सरकारचा विकासाचा अजेंडा आणि २०४७ पर्यंत विकसित भारताचा दावा हा भाजपचा निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा आहे. यावरुनच पंतप्रधानांनी थेट लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. पंतप्रधानांनी या पत्रामध्ये शेवटी म्हटलं आहे की, लोकशाहीचं सौंदर्य हे लोकसहभागात आहे. देशहितासाठी मोठे निर्णय घेणं, मोठ्या योजना बनवणं आणि त्या लागू करणं लोकांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. मला तुमच्या सहकार्याची आणि सूचनांची नितांत गरज आहे. मला विश्वास आहे की, तुमची साथ मला मिळणारच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here