काेड रेड…
Police : नगर : मनमाड महामार्गाचे सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुसरीकडे कोल्हार येथील पुलाच्या कामामुळे अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा (Law and order) प्रश्न निर्माण हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नगर-मनमाड महामार्गावरील (Nagar-Manmad Highway) जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे, असे आदेश पाेलीस (Police) अधीक्षक राकेश ओला यांनी जारी केले आहेत. हे आदेश उद्या (ता. ८) ते १४ डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे.
हे देखील वाचा: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील : बाळासाहेब थोरात
प्रशासनाने वाहतुकीत केलेल्या बदलानुसार विळद वायपास -शेंडी बाह्यवळण- नेवासे-कायगाव- गंगापूर-वैजापूर येवला मार्गे-मनमाडकडे अथवा केडगाव बाह्यवळण-कल्याण बाह्यवळण-आळेफाटा संगमनेरमार्गे नाशिककडे वाहनांना जाता येणार आहे. शनिशिंगणापूर-सोनाईवरून राहुरी मार्गे मनमाडकडे जाणाऱ्या जड वाहनांना नगर-छत्रपती संभाजीनगर, अशी वाहतूक वळवण्यात येणार आहे. देहरे-राहुरी कृषी विद्यापीठ-राहुरीकडून मनमाडकडे जाणाऱ्या जड वाहनांकरिता श्रीरामपूर-बाभळेश्वर-निर्मळ पिंपरी बायपासमार्गे कोपरगाव-येवला-मनमाडकडे पर्यायी मार्ग राहणार आहे.
नक्की वाचा : संसदेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज; खासदार सुजय विखेंनी मांडली भिंगारकरांची बाजू
मनमाडकडून नगरकडे येणाऱ्या जड वाहनांकरिता पर्यायी मार्ग पुणतांबा फाटा-वैजापूर-गंगापूर-कायगाव-नेवासे-शेंडी बाह्यवळण-विळद बाह्यवळण-केडगाव बाह्यवळण, असा राहील. लोणी-बाभळेश्वरकडून नगरकडे येणाऱ्या वाहनांसाठी बाभळेश्वर-श्रीरामपूर-टाकळीभान नेवासेमार्गे नगरकडे जाता येईल. मनमाडकडून नगर मार्गे पुणे-मुंबई-कल्याणकडे जाणाऱ्या जड वाहनांकरिता पर्यायी मार्ग पुणतांबा फाटा-झगडे फाटा-सिन्नर-नांदूर शिंगोटे-संगमनेर-आळेफाटा मार्गे वाहतूक वळवण्यात येणार आहे.