Police : अपघातानंतर लूटमार करणाऱ्या आरोपींना अटक

नगर शहरात अपघातानंतर लूटमार करणाऱ्या सराईत आरोपींना कोतवाली पोलिसांनी काल (बुधवारी) जेरबंद केले.

0

नगर : नगर शहरात अपघातानंतर (accident) लूटमार करणाऱ्या सराईत आरोपींना (Accused) कोतवाली पोलिसांनी (Police) काल (बुधवारी) जेरबंद केले. अविनाश विश्वास जायभाय (रा. दुधसागर सोसायटी, केडगाव, नगर) व अजित रामदास केकाण (रा. सारसनगर, नगर) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.

हे देखील वाचा: नेवासा येथे उपोषणाच्या पाचव्या दिवशी बंदला १०० टक्के प्रतिसाद

नगर शहरात करपे वीट भट्टीजवळुन आशीर्वाद कॉलनीकडे वाहन चालक अफताब बागवान हे त्याचे नातेवाईकांसह ३० नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास टॅम्पोतून जात होते. त्यांच्या टॅम्पोला थांबवून पाण्याच्या बाटलीची मागणी करुन पाणी दिले नाही म्हणून मारहान करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच वाहनातील दोन लाख २५ हजार रुपये रोख व दहा हजार रुपयांचा मोबाईल, पाकीट त्यातील महत्वाचे कागदपत्रे, आधारकार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हींग लायसन, बँक एटीएम कार्ड याची चोरी केली. या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात अविनाश जायभाय व इतर आरोपींच्या विरुध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नक्की वाचा : मराठा आरक्षणासाठी माजी सैनिकाच्या पत्नीचा आत्महत्येचा इशारा


कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे यांच्याकडे गुन्ह्यातील आरोपींचा तपास सोपवला होता. त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून दोन्ही आरोपींना गजाआड केले. अटक आरोपींवर मारामारी तसेच चोरीचे बरेच गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.