Police : श्रीगोंदा : तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी “फिरते पोलीस स्टेशन” या उपक्रमाची सुरुवात करत हद्दिमधील गावात जाऊन नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत त्या तक्रारींचा जागीच निपटारा केला. तसेच परिसरातील गुन्हेगारी (Criminality) रोखण्यासाठी ग्रामरक्षक दल ऍक्टिव्ह करणे, गावामध्ये सीसीटीव्ही (CCTV) बसविणे या सारख्या सूचना केल्या. या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
नक्की वाचा: आम्ही असं आंदोलन केलं असतं तर गोळ्या घातल्या असत्या : अबू आझमी
शेतीच्या वादातील तक्रारी जागीच सोडविल्या
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत “फिरते पोलीस स्टेशन” या उपक्रमाची पिंपरी कोलंदर येथून सुरू केली. या उपक्रमात पिंपरी कोलंदर, राजापूर, देवदैठण, ढवळगाव येथील नागरिकांच्या शेतीच्या वादातील तक्रारी सारख्या तक्रारींची शहनिशा करत त्यांच्या तक्रारी जागीच सोडविल्या.
हे देखील वाचा: मनोज जरांगे पाटलांचा स्वतंत्र आरक्षणासाठी नकार
गुन्हेगारी रोखण्यासाठी ग्रामस्थांना सूचना (Police)
तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी गावातील ग्रामरक्षक दल ऍक्टिव्ह करणे, गावामध्ये सी सी टी व्ही बसविणे, शाळा सुटल्यावर शिक्षकांनीही सर्व मुले जाईपर्यंत शाळेचा गेट वर थांबणे, परिसरातील मंदिरात देवी देवतांचे मौल्यवान दागिने कार्यक्रम व्यतिरिक्त ठेवू नये. तसेच मंदिरातील दानपेटी महिन्याला उघडावी, याबाबत ग्रामस्थांना सूचना दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, हसन शेख, भाऊसाहेब यमगर, शरद गांगर्डे, विकास सोनवणे, कविता माने यांच्यासह गावातील पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.