Police : राहुरी : राहुरी बस (Bus) स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्रअज्ञात भामट्याने चोरुन (Theft) नेल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. ही बस पोलीस (Police) ठाण्यात नेण्यात आली.
हे देखील वाचा: नगर लोकसभा निवडणुकीत आता दुरंगी लढत; नाटयमय घडामाेडीनंतर भल्याभल्यांची सपशेल माघार
अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरी
प्रिती ज्ञानेश्वर वाकळे (रा. नाशिक) यांचे राहुरी येथील मामाच्या घरी आल्या होत्या. आज दुपारी सव्वादोन वाजे दरम्यान नाशिक येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. राहुरी बस स्थानक येथे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात भामट्यांनी हाथ की सफाई करत प्रीती वाकळे यांच्या गळ्यातील अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र कोणत्या तरी धारदार वस्तूने कापून घेतले. एसटी बस गेटमधून बाहेर निघताना प्रिती वाकळे अर्धे मंगळसूत्र तसेच त्यांच्या गळ्यात लटकून राहिल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरडा केला.
नक्की वाचा : अपहरण झालेल्या तीन अल्पवयीन मुलींची सुटका
गुन्हा दाखल (Police)
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन एसटी बस राहुरी पोलीस ठाण्यात आणली. तेथे पोलीस व महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी बसमधील सर्व प्रवाशांची अंगझडती घेऊन तपासणी करण्यात आली. मात्र, मंगळसूत्र चोरणारा भामटा हाती लागला नाही. तपासणी झाल्यानंतर एसटी बस प्रवाशांसह मार्गस्थ करण्यात आली. प्रीती वाकळे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.