Police : पोलिसांवरील दगडफेक प्रकरणी दहा जणांना अटक

Police : पोलिसांवरील दगडफेक प्रकरणी दहा जणांना अटक

0
Police
Police : पोलिसांवरील दगडफेक प्रकरणी दहा जणांना अटक

Police : श्रीरामपूर : येथील शिवाजी चौकात मिरवणूकीमध्ये बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी शहर पोलीस (Police) ठाण्यात २० जणांविरुध्द गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे. यापैकी दहा आरोपींना (Accused) अटक करण्यात आली आहे. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बाकीच्या आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हे देखील वाचा: जातीवाचक शिवीगाळ, नग्न करुन मारहाण; तरुणाची आत्महत्या

दगडफेकीमध्ये दोन पोलीस कार्मचारी जखमी

काल सायंकाळी काझीबाबा संदल मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणूक शिवाजी चौकामध्ये आल्यानंतर त्याच ठिकाणी बराच वेळ मिरवणूक सुरु होती. एकाच ठिकाणी जास्तवेळ थांबू नका, असे सांगायला गेलेल्या पोलिसांवरच मिरवणूकीतून काही तरुणांनी दगडफेक केली. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यावेळी शिवाजी चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नक्की वाचा: नरेंद्र माेदींकडून आराेग्य विकास प्रक्रियेशी जाेडण्याचे महत्त्वपूर्ण काम : राधाकृष्ण विखे पाटील

२० जणांविरुध्द गुन्हा दाखल (Police)

याप्रकरणी राहुल बाजीराव खेडकर (नेमणूक, नगर मुख्यालय) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात २० जणांविरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये लुकमान शाह, आदम शाह, अमीर पठाण, सोहेल शेख, इम्रान शेख, अफरोज शाह, अंजर शाह, गुलाब शाह, तौफिक शाह, अवेज शाह या दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here