Police : नगर : केडगाव येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीला (Accused) कोतवाली पोलिसांनी (Police) काल (गुरुवारी) जेरबंद केले. त्यामुळे पाच घरफोडीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. विष्णू सोनबा धोत्रे (रा. वडारवाडी, केडगाव, नगर) असे जेरबंद (Imprisoned) आरोपीचे नाव आहे.
हे देखील वाचा: शांतीगिरी महाराजांचा नाशिकमध्ये हटके प्रचार
दाराचा कडीकोयंडा तोडून चोरी
केडगाव येथील शाहूनगरच्या बालाजी कॉलनीतील रहिवासी मधुकर भावले हे सहकुटुंब ७ ते १२ मे या कालावधीत पुण्याला मुलाकडे गेले होते. दरम्यान, त्यांच्या बंद घराच्या दाराचा कडीकोयंडा चोरांनी तोडून घरातील १५ हजार रुपये चोरून नेले. या संदर्भात भावले यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून घेतला.
नक्की वाचा: नाशिकमध्ये चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची पोलिसांकडून झाडाझडती
सापळा रचून आरोपीला केले जेरबंद (Police)
या घटनेचा तपास करण्याचे आदेश कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिले होते. कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली की, ही घरफोडी विष्णू धोत्रे याने केली आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला जेरबंद केले. त्याच्याकडे पथकाने अधिक विचारपूस केली असता त्याने केडगावमधील घरफोडीसह आणखी पाच गुन्ह्यांची कबुली दिली. त्याने पथकाला घरात लपवून ठेवलेले २८ हजार रुपये रोख व २२ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने असा ५० हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांना काढून दिला.