Police : कोपरगाव: तालुक्यासह इतर विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी (Theft) करणाऱ्या सराईत चोरास शहर पोलिसांनी (Police) लोणी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल 12 लाख 77 हजार रुपयांच्या २४ दुचाकी शहर पोलिसांनी हस्तगत केल्या आहे. कृष्णा प्रकाश शिंदे (वय २७) असे या सराईत चोराचे (Thief) नाव असून तो कोपरगाव शहरातील इंदीरानगर येथील रहिवासी आहे. तसेच ज्या इसमाच्या मार्फत तो सदर मोटारसायकली विक्री करत होता, तो श्रावण सखाराम वाघ (वय ५६, रा. सोमठाणे जोश, ता. येवला, जि.नाशिक) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावरही शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. सदर मुख्य आरोपीवर इतर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे.
अवश्य वाचा : नीलेश लंकेंनी इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
शहर पोलिसाच्या या कारवाईचे कौतुक (Police)
दरम्यान, ज्या नागरिकांच्या दुचाकी चोरीस गेल्या होत्या, त्यांच्या दुचाकी पुन्हा परत मिळत असल्याने त्यांनी शहर पोलिसाच्या या कारवाईचे कौतुक करत पोलिसांचे आभार मानले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदिप देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, मयूर भामरे, पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बी.एस. कोरेकर, तिकोणे, जालिंदर तमनर, अर्जुन दारकुंडे, अशोक शिंदे, पोहेकॉ दिपक रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे, श्रीकांत कुऱ्हाडे, महेश फड, बाळु धोंगडे आदींनी केली आहे. याबाबत शिर्डी उपविभागीय पोलीस अधीकारी शिरीष वमने यांनी अधिक माहिती दिली