Police : नगर : इस्राईल आणि पॅलेस्टाईन युद्धाचे (Israel Palestine War) प्रसार माध्यम व सोशल मीडियावर येणारे व्हिडिओ पाहून युवक प्रभावित झाला होता. त्यातूनच त्याने समाजासाठी युद्धात शहीद व्हायचे ठरवेल, आणि पॅलेस्टाईनला जाण्यासाठी थेट मुंबई (Mumbai) गाठली. मात्र मित्रांच्या आणि कुटुंबीयांच्या मदतीने त्या तरुणाला नगरमध्ये आणण्यात पोलिसांनी (Police) यश आलं आहे.
नक्की वाचा: भारताला मोठा धक्का!विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र
पॅलेस्टाईनला जाऊन युद्धात शहीद होण्याचा
नगर शहरातील बोल्हेगाव परिसरात राहणाऱ्या एका युवकाने चक्क पॅलेस्टाईनला जाऊन युद्धात शहीद होण्याचा निर्णय घेतला होता. तो नेहमी मोबाईलवर इंस्टाग्राम आणि युट्युबच्या माध्यमातून इस्राईल आणि पॅलेस्टाईन युद्धाचे व्हिडिओ पाहत होता आणि मित्रांबरोबर समाजावर होणाऱ्या अत्याचाराबाबत चर्चा करत होता. हा मुलगा घरातून निघून गेल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, तो कुठेच सापडत नसल्याने कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठत मुलगा हरवला असल्याची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
अवश्य वाचा: निळवंडेच्या कालव्यातून दुष्काळग्रस्त भागाला तातडीने पाणी सोडा : आमदार थोरात
मित्राला फोनवरून पॅलेस्टाईनला जाणार असल्याचे कळवले (Police)
सदर युवकाचा पोलीस आणि त्याच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध सुरु केला होता. दरम्यान, या युवकाने त्याच्या मित्राला फोन करून मी पॅलेस्टाईनला जाणार आहे, तुला पण माझ्याबरोबर यायचे असेल तर तूही मुंबईला ये असा निरोप पाठवला. या निरोपावरूनच शोध घेत कुटुंबीयांनी थेट मुंबई गाठत आपल्या मुलाला ताब्यात घेतले. त्याला पुन्हा नगरमध्ये आणण्यात यश मिळाले आहे.
या घटनेबाबत तोफखाना पोलिसांनी गांभीर्याने चौकशी सुरू केली असून मुलाचे समुपदेशन सुरू आहे. हा नगरमधील युवक कोणाच्या संपर्कात होता, याची माहितीही पोलिसांसह विविध गुप्तचर यंत्रणा घेत आहेत. यासाठी या युवकाचे फेसबुक, इन्स्टाग्राम खाते तपासले जात आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.