Police : श्रीरामपूर : तालुक्यातील उंबरगाव-मातापूर रस्त्यावरील गुटखा पानमसाला विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने कारवाई केली. राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा पानमसाल्याच्या गोण्या दोघे तिघेजण चारचाकी वाहनातून शेजारी लावलेल्या दुसऱ्या चारचाकी वाहनात टाकत होते. पथकाने चारचाकी वाहनासह तब्बल ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यात तीन आरोपींना पोलिसांनी (Police) ताब्यात घेण्यात आले तर तीन आरोपी (Accused) पसार आहेत.
नक्की वाचा: मराठ्यांचं वादळ साेमवारी नगरमध्ये धडकणार; महाशांतता रॅलीची जय्यत तयारी, असे असेल नियोजन
उंबरगाव-मातापूर रस्ता परिसरात कारवाई
गुरूवारी (ता. ८) रात्री १०.३० च्या सुमारास श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव-मातापूर रस्ता परिसरात ही कारवाई झाली. याचवेळी पोलिसांनी तेथे छापा टाकून आरीफ महेबूब शेख, बाबा गफूर तांबोळी, कलीम रहीम शाह यांना रंगेहाथ पकडले. तेथून परवेज नवाब शेख हा पळून गेला आहे. पोलिसांनी आरोपींकडून गोण्यांमध्ये भरलेला केसरयुक्त पान मसाल्याचे तसेच तंबाखूच्या पुड्यांच्या गोण्या तसेच दोन चारचाकी वाहनांसह ३ मोबाईल असा एकूण ९ लाख १६ हजार ४६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पकडलेल्या आरोपींनी हा माल राहाता तालुक्यातील वाकडी येथील सद्दाम अकबर शेख तसेच बीड जिल्ह्यातील मोमीनपुरा येथील इकबाल शेख यांच्याकडून आणल्याचे सांगितले.
अवश्य वाचा : मराठी सिनेसृष्टीवर शोककळा;ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन
यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल (Police)
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्टेबल भाऊसाहेब काळे यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी आरीफ महेबूब शेख (वय ३१, रा. येलमवाडी, जळगाव, ता. राहाता), बाबा गफूर तांबोळी (वय ४४, रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर), कलीम रहीम शाह (वय ३३, रा. पूनमनगर, शिर्डी, ता. राहाता) तसेच पसार असलेले परवेज नवाब शेख (रा. श्रीरामपूर), सद्दाम अकबर शेख (रा. वाकडी, ता. राहाता), इकबाल शेख (रा. मोमीनपुरा, जि. बीड) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.