Police : मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीत १४ खिसेकापू; कोतवाली पोलिसांनी साडेसहा लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत

Police : मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीत १४ खिसेकापू; कोतवाली पोलिसांनी साडेसहा लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत

0
Police : मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीत १४ खिसेकापू; कोतवाली पोलिसांनी साडेसहा लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत
Police : मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीत १४ खिसेकापू; कोतवाली पोलिसांनी साडेसहा लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत

Police : नगर : शहरात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची काल (सोमवारी) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी शांतता रॅली झाली. या रॅलीत घुसलेल्या १४ खिसेकापूंना (Thief) कोतवाली पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले. पथकाने आरोपींकडून चोरीस गेलेली रोकड, एक चारचाकी व दोन दुचाकी असा ६ लाख ६७ हजार रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत केला.

नक्की वाचा : आमची सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवू’- संजय राऊत

ठिकठिकाणी लोकांच्या गर्दीत घुसून हातसफाई

मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली व जनसंवाद सभेत घुसून खिसे कापू चोरट्यांची टोळी हातसफाई करणार असल्याची गोपनिय माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाला चोरटे पकडण्याबाबत सूचना केल्या होत्या. खिसे कापू टोळी ही जामखेड व नगर शहरातील असल्याची गोपणीय माहिती पोलीस निरीक्षक दराडे यांना मिळाली. दुपारी ही टोळी नगरमध्ये एक चारचाकी व दोन दुचाकी सह शहरात आली. या रॅलीत सहभागी झाल्यावर ठिकठिकाणी लोकांच्या गर्दीत घुसून हातसफाई करणाऱ्या चोरट्यांना मोठ्या शिताफीने कोतवाली गुन्हे शोध पथकाने रॅली व सभेतून १४ खिसेकापू चोरट्यांना ताब्यात घेतले.

अवश्य वाचा: मनाेज जरांगे गरजले; आता विधानसभेला दणादण नाव घेऊन पाडणार, कुणाचे टेन्शन वाढणार?

अशी जेरबंद आरोपींची नावे (Police)

यात सचिन विष्णु खामकर (वय ३८, रा. प्रेमदान हडको, नगर), अण्णा बाळू पवार (वय ५१, रा. मिलिंद नगर, ता. जामखेड), श्यामराव रामा गायकवाड (वय २२, रा. मिलिंद नगर, ता जामखेड), अर्जुन तुळशीराम जाधव (वय २०, रा. सुपा हाईडसजवळ, सुपा, ता. पारनेर), मच्छिंद्र दशरथ गायकवाड (वय २६, रा. मिलिंद नगर, ता. जामखेड), राहुल शरद पवार (वय २०, रा. नान्नज जवळा, ता. जामखेड), बबलू रोहीदास साठे (वय २५, रा. मिलिंद नगर, ता. जामखेड), शीतल रावसाहेब काळे (वय २४, रा. मिलिंद नगर, ता जामखेड), विकास रमेश गायकवाड (वय २०, रा. मिलिंद नगर, ता. जामखेड), सागर बाळू रिटे (वय २५, रा. कुंभार तळ, ता जामखेड), एक अल्पवयीन मुलगा, विजय अशोक माने (वय २२, रा. मिलिंदनगर, शिक्षक कॉलनी, जामखेड, ता जामखेड), अजिनाथ अण्णा गायकवाड (वय ६०, रा. मिलिंद नगर, जामखेड, ता जामखेड), नागू अण्णा गायकवाड (वय ५४, रा. मिलिंद नगर, जामखेड, ता जामखेड) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here