Police : नगर : महिलांमध्ये पोलिसांबाबतची (Police) भीती दूर व्हावी यासाठी भिंगार कॅम्प पोलीस (Bhingar Camp Police) ठाणे व स्नेहबंध फाऊंडेशनतर्फे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात काल (मंगळवारी) ‘राखी विथ खाकी’ हा उपक्रम राबवण्यात आला. पोलीस अधिकारी व अंमलदार यांना महिलांनी राखी बांधून (Raksha Bandhan) औक्षण केले. उपस्थित महिलांना संरक्षणाबाबत (Protection of women) पोलिसांनी आश्वस्त करण्यात आले.
नक्की वाचा: ‘कर्जमुक्ती योजने’साठी आधारची केवायसी गरजेची : शिवाजी कर्डिले
यांची उपस्थिती (Police)
याप्रसंगी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, स्नेहबंध फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उध्दव शिंदे, स्त्री महिला सखी मंचच्या अध्यक्षा ज्योस्त्ना मुंगी, ईशानी खामकर, सेवानिवृत्त अधिकारी अमर गुरप, माजी प्राचार्य एकनाथ जगताप, जानव्ही मुंगी, शांता केदारे, योगीता केदारे, भारती देशमुख, सानिका तुंगार, स्वयंम बास्कर, आयुष लालबोंद्रे आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा: विकासाचा झंझावात सुरू : संग्राम जगताप
उद्धव शिंदे म्हणाले, (Police)
बंदोबस्तावरील पोलिसांना सण साजरे करण्याचे प्रकार दुर्मिळच म्हणावे लागतील. पोलीस बांधव २४ तास समाजाचे रक्षण करतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमामुळे पोलीस बांधव भारावून गेले. यात एक वेगळी आनंदाची अनुभूती मिळाली, अशी प्रतिक्रिया उद्धव शिंदे यांनी दिली.