Police : पोलीस ठाण्यात पार पडला रक्षाबंधन सोहळा

Police : पोलीस ठाण्यात पार पडला रक्षाबंधन सोहळा

0
Police : पोलीस ठाण्यात पार पडला रक्षाबंधन सोहळा
Police : पोलीस ठाण्यात पार पडला रक्षाबंधन सोहळा

Police : कर्जत : रक्षाबंधन (Raksha Bandhan) म्हणजे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण. परंतु रक्षाबंधन असो, वा अन्य कोणताही सण- उत्सव ! पोलिसांना (Police) कायदा आणि सुव्यवस्था (Law and order) सांभाळण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या कामावरच ‘ऑन ड्युटी’ हजर रहावे लागते. त्यामुळे अनेकदा आपल्या बहिणीसोबत आणि परिवारासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करता येत नाही. मात्र, कर्जतमधील (Karjat) सखी मंचच्या महिलांनी अचानक पोलीस ठाण्यात येऊन पोलीस निरीक्षक मारुती मुलूक यांच्यासह कर्तव्यावर हजर असणाऱ्या पोलीस दादांना राखीचे बंधन बांधून बहीण-भावाच्या प्रेमाचा आल्हाददायक गारवा दिला.

नक्की वाचा: धक्कादायक! बदलापूरच्या शाळेत चार वर्षांच्या चिमुकल्यांवर अत्याचार

पोलीस दलात नोकरी म्हणजे अतिरिक्त कामाचा ताण (Police)

पोलीस दलात नोकरी करणे म्हणजे कायम तत्पर आणि दक्ष होत हजर राहणे. कधी, कोणत्या वेळी, कुठे आणि काय परिस्थिती उभा राहिल याची शाश्वती नसणे. अशा काळात सण काय, उत्सव काय त्यांना साजरा करणे म्हणजे एक दिव्य स्वप्नच ठरते. विशेष म्हणजे यांच्यासाठी सण किंवा उत्सव म्हणजे इतर दिवसांपेक्षा अतिरिक्त कामाचा ताण ठरतो.

अवश्य वाचा: जखणगाव अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

अचानक महिला जमा झाल्याने पोलसांना पडला प्रश्न (Police)

सोमवारी नुकताच रक्षाबंधन सण सर्वत्र साजरा होत असताना नित्यनियमाप्रमाणे कर्जत पोलीस ठाण्यात नियुक्तीवर असणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कर्तव्यावर हजर होते. ठीक १० वाजता एक-एक महिला पोलीस ठाण्यात जमण्यास सुरुवात झाली. जे मागील वर्षी पोलीसदादा कर्जतमध्ये हजर होते. त्यांनी काही चेहरे ओळखले. पण जे नव्याने हजर होते. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र काही अघटित घडले काय? या प्रश्नाने काहूर माजले. तोच शिक्षक कॉलनी आणि शहरातील नक्षत्र सखी मंचच्या भगिनी ओवाळणीचे ताट, ताटात सुंदर आणि आकर्षक राख्या घेऊन येत सर्वांना पोलीस निरीक्षक दालनात बोलावत त्यांना औक्षण करीत राख्या बांधतात. महिला-भगिनींनी राख्या बांधताना पोलीस अधिकारी-कर्मचारी भारावून गेले. ओवाळणी म्हणून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेत अडचणीच्या काळात पोलीस निरीक्षक मुलूक यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी-कर्मचारी बांधवांनी शहरातील बहिणींच्या रक्षणासाठी योग्य ती कारवाई करत असून काहीही तक्रार असेल तर संपर्क करण्याबाबत आवाहन केले.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक रमीज मुलानी, प्रदीप बोराडे, पोलीस कर्मचारी यांच्यासह कवयित्री स्वाती पाटील, शिल्पा माळवे, शबनम मुंढे, निर्मला खराडे, वैशाली टकले, प्राची मुळे, मनिषा कदम, आशा वाघ, प्रमा गोंदकर, मिरा जाधव, आरती टकले आदी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here