Police : नगर : शहरात काल (ता.३) रात्री मद्यधुंद अवस्थेत वृत्तपत्र छायाचित्रकार (Newspaper photographer) तथा स्थानिक वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी अजहर सय्यद यांना मारहाण केल्याचा आरोप करत कोतवाली पोलीस (Police) ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यांचं निलंबन करा, या मागणीसाठी शहरातील पत्रकारांच्या (Journalist) शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक (District Superintendent of Police) राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले.
नक्की वाचा : महापालिका कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू
पत्रकार व वृत्त छायाचित्रकारांकडून घटनेचा निषेध
यावेळी सर्व वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी व वृत्त छायाचित्रकार यांनी या घटनेचा निषेध नोंदविला. अजहर सय्यद हे वृत्त छायाचित्रकार व एका स्थानिक वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी म्हणून शहरात काम करत आहे. मंगळवारी (ता. ३) रात्री १२ वाजल्याच्या दरम्यान सय्यद हे जुने बसस्थानक येथे उभे असताना, पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे पोलीस वाहनात चालकासह आले होते.
अवश्य वाचा : आमदार थोरात यांचा “उत्कृष्ट संसदपटू” पुरस्काराने गौरव
ओळख सांगितल्यानंतरही मारहाण (Police)
वाहनातून उतरल्यानंतर त्यांनी तेथे असलेल्या इतर व्यक्तींना शिवीगाळ करुन धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. सय्यद यांच्याकडे येऊन त्यांनाही शिवीगाळ केल्यानंतर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम करत असल्याची ओळख सांगितली. मात्र, महेश शिंदे मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांनी काहीही ऐकून न घेता अरेरावीची भाषा करत मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शिंदे यांना काय करतोय व काय बोलतोय? याचे देखील भान नव्हते. जे दिसेल त्यांना मारण्याचा सपाटा त्यांनी सुरु केल्याने संपूर्ण बसस्थानक परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा काही पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस दलाची बदनामी होत आहे. दारु पिऊन ड्युटीवर येणे व सर्वसामान्य नागरिकांमध्ये दशहत पसरविणे ही पोलीस खात्याला बदनामीकारक बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मद्यधुंद पोलीस अधिकाऱ्याचे तत्काळ निलंबन करुन त्यांची बदली करा, अशी मागणी पत्रकारांच्या शिष्टमंडळातर्फे करण्यात आली आहे.