Police : शांतता व सलोख्यासाठी व्यापार्‍यांचे निवेदन

Police : शांतता व सलोख्यासाठी व्यापार्‍यांचे निवेदन

0
Police : शांतता व सलोख्यासाठी व्यापार्‍यांचे निवेदन
Police : शांतता व सलोख्यासाठी व्यापार्‍यांचे निवेदन

Police : श्रीरामपूर : येथे जातीय सलोखा व शांतता (Peace) प्रस्थापित होण्यासाठी जिल्हा पोलीस (Police) अधीक्षक राकेश ओला (Rakesh Ola) यांनी शहरातील कार्यकर्त्यांची व व्यापार्‍यांची संयुक्त बैठक घेऊन सलोखा निर्माण करावा, अशी मागणी श्रीरामपूर मर्चंटस् असोसिएशनचे (Merchants Association) अध्यक्ष सुनील गुप्ता, उपाध्यक्ष बाळासाहेब खाबिया व संचालकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

नक्की वाचा: बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

शहरामध्ये गणेशोत्सव सुरू

शहरामध्ये गणेशोत्सव सुरू आहे. त्यानंतर नवरात्र व शारदोत्सव, दसरा, दीपावली सण आहेत. शहरामध्ये वातावरण अशांततेचे आहे. कोणत्या न कोणत्या कारणावरून बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले जाते. त्यामुळे बाजारपेठेत ग्राहकांवर परिणाम होतो. उलाढाल कमी होते. नागरीकांना व व्यापार्‍यांना भविष्यात त्रास होवू नये, यासाठी पोलीस अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी व्यापारी, कार्यकर्ते, समाज प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आदींची संयुक्तीक बैठकीद्वारे चर्चा करून शहरात सलोखा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत, या मागणीचे निवेदन व्यापारी असोशिएसचे अध्यक्ष सुनील गुप्ता, उपाध्यक्ष बाळासाहेब खाबिया, सेक्रेटरी दत्तात्रय ढालपे, सह. सेक्रेटरी संजय कासलीवाल, संचालक राहुल रमेश कोठारी, गौतम उपाध्ये, अनिल लुल्ला, प्रेमचंद कुंकुलोळ आदींचे शिष्टमंडळाने नगरला जावून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत निवेदन दिले.

अवश्य वाचा: आरक्षणासंदर्भातील खोटेपणा उघड; मंत्री विखे पाटलांची काँग्रेसवर टीका

पोलिस अधीक्षक ओला यांनी दिले आश्‍वासन (Police)

पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी शांतता व सलोख्यासाठी निश्‍चित त्वरीत प्रयत्न करण्यात येतील. अप्पर पोलीस अधिक्षकांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.