Police : नाऊर येथे चेकपोस्ट; पोलिसांची राहणार करडी नजर

Police : नाऊर येथे चेकपोस्ट; पोलिसांची राहणार करडी नजर

0
Police : नाऊर येथे चेकपोस्ट; पोलिसांची राहणार करडी नजर
Police : नाऊर येथे चेकपोस्ट; पोलिसांची राहणार करडी नजर

Police : श्रीरामपूर : तालुक्यातील नाऊर येथील चौफुलीमध्ये जिल्हाधिकारी (Collector) यांच्या आदेशाने महसूल विभागाने (Department of Revenue) चेकपोस्ट टाकला असून या ठिकाणी विधानसभा निवडणूक (Assembly Elections) काळात रात्रंदिवस पोलिसाकडून (Police) वाहनांची चेकिंग करण्यात येणार आहे.

नक्की वाचा: आदर्श आचारसंहिता लागू होण्याच्या ४८ तासात जिल्ह्यातील २४ हजार ९६९ जाहिराती काढल्या

वाहनांवर कडक लक्ष देऊन कारवाई केली जाणार

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी सिताराम सालीमठ व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहितेचे पालन करण्यासाठी श्रीरामपूर महसूल विभाग तहसीलदार मिलिंदकुमार वाघ तसेच अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपाधिक्षक बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचेसह पोलीस कर्मचारी या ठिकाणाहून ये – जा करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून राहणार असून यामध्ये प्रामुख्याने दारू/ हत्यारे तसेच बेहिशोबी मालमत्ता, रोकड आदी वाहनांवर कडक लक्ष देऊन कारवाई केली जाणार आहे.

अवश्य वाचा: बिबट प्रवण क्षेत्रात ऊसतोड करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन

तहसीलदार यांनी पाहणी करून दिल्या सूचना (Police)

याप्रसंगी तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी नाऊर येथील चेक पोस्टची पाहणी करून संबंधित पोलीस कर्मचारी व महसूल कर्मचारी यांना बॅरिकेट्सवर रेडियम लावणे, रात्री मोठा लाईट बसवणे तसेच वाहतुकीच्या दृष्टीने अडथळा निर्माण होऊ नये तसेच चेकपोस्ट रोडलगत असल्याने शिवाय शेजारी खड्डयात असलेल्या पाण्यामुळे डास आदीबाबत योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार वाघ यांच्यासमवेत पीएसआय एस.एस. बोडखे, पोलीस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर ढोकणे, बाबर आदी उपस्थित होते.