Police : समस्त आंबेडकरी समाज व मातंग समाजाने काढला पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

Police : समस्त आंबेडकरी समाज व मातंग समाजाने काढला पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

0
Police : समस्त आंबेडकरी समाज व मातंग समाजाने काढला पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा
Police : समस्त आंबेडकरी समाज व मातंग समाजाने काढला पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

Police : नगर : माजी महापौर संदीप कोतकर (Sandeep Kotkar) यांचे बंधू सचिन कोतकर (Sachin Kotkar) यांच्या कथित वायरल क्लिप मुळे आंबेडकरी समाज आक्रमक झाला आहे. सचिन कोतकर यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी समस्त आंबेडकरी समाज व मातंग समाजातर्फे पोलीस (Police) अधीक्षक कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला.

नक्की वाचा: भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच राजकीय बंडाळ्या सुरू

महिला व समाज बांधव उपस्थित

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात आंबेडकरी समाजाचे अशोक गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, अजय साळवे, सुमेध गायकवाड, किरण दाभाडे, अनंत लोखंडे, रोहित आव्हाड, सुनील क्षेत्रे, सुशांत म्हस्के, नितीन कसबेकर, अनिल शेकटकर, पोपट पाथरे आदींसह महिला व समाज बांधव उपस्थित होते.

Police : समस्त आंबेडकरी समाज व मातंग समाजाने काढला पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा
Police : समस्त आंबेडकरी समाज व मातंग समाजाने काढला पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

अवश्य वाचा: राज्यात आज पुन्हा जोरदार पावसाच्या सरी!’या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

निवेदनात म्हटले आहे की, (Police)

त्या वायरल रेकॉर्डिंग मुळे समस्त मागासवर्गीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. लवकरात लवकर चौकशी करून ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा व कोतकर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून अशा व्यक्तींची चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी व कोतकर यांनी पहिल्यापासून देखील बौद्ध व मातंग समाजाच्या कुटुंबीयांना टार्गेट केलेले आहे. निवडणुका जाहीर झाल्यावर समाजामध्ये तेड निर्माण करण्यासाठी अशा क्लिपा व्हायरल करत आहे. त्यामुळे लवकरात लवकर येत्या दोन दिवसांत गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अन्यथा आंबेडकरी समाज हा रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.