Police : पोलीस असल्याचे सांगून साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लुटले

Police : पोलीस असल्याचे सांगून साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लुटले

0
Police : पोलीस असल्याचे सांगून साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लुटले
Police : पोलीस असल्याचे सांगून साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लुटले

Police : कोपरगाव : पोलीस (Police) असल्याची बतावणी करून एका वृद्ध इसमाचे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) लुटल्याची (Theft) घटना कोपरगाव शहरातील शिवाजीनगर कलावती माता मंदिराजवळ घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV camera) कैद झाले आहेत.

नक्की वाचा: लाल संविधान दाखवून तुम्ही कोणाला इशारा देताय? – देवेंद्र फडणवीस

दोन इसम दागिने घेऊन पसार

कोपरगाव शहरातील जोशीनगर येथील ७६ वर्षीय व्यापारी सीताराम फकिरा डांगे सोमवारी (ता.४) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास शहरातील शिवाजीनगर कलावती माता मंदिराजवळून दुचाकीवरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी डांगे यांना थांबवत आम्ही दोघे पोलीस आहोत, तुम्ही एवढे सोन्याचे दागिने अंगावर का घातले, एवढ सोन अंगावर घालयच नाही, ते आमच्याकडे दया, आम्ही तुम्हाला एकत्र बांधून देतो असे डांगे यांना सांगितले. डांगे यांनी त्यांच्याकडील साडेतीन तोळ्याचे सर्व सोन्याचे दागिने त्या दोन अज्ञात व्यक्तीकडे दिले असता सदर दोन इसम ते दागिने घेऊन पसार झाले आहेत.

अवश्य वाचा: ‘बारामतीच्या विकासात माझा खारीचा वाटा’-अजित पवार

दोन अनोळखी इसमांविरोधात तक्रार दाखल (Police)

आपली फसवणूक झाल्याचे समजताच डांगे व त्यांच्या घरच्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत त्या दोन अनोळखी इसमांविरोधात तक्रार दाखल केली आहे. डांगे यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी त्या दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर चोरांचा तपास सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन तमनर हे करीत आहे.