Police : नगर : धुळे शहरासह जिल्हाभरात मतदान (Voting) उत्साहात सुरू असून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी, यासाठी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस (Police) प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच वाहनांची तपासणी केली जात आहे.
नक्की वाचा : मतदान प्रक्रियेवर प्रशासनाची करडी नजर
१० हजार किलो चांदीच्या वीटा
दरम्यान पहाटे पाच वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी पहाटे ५ वाजता एका कंटेनरची तपासणी केली असता त्यात १० हजार किलो चांदीच्या वीटा मिळाल्या आहेत. ३० किलो चांदीची एक वीट अशा ३३६ विटा आहेत. त्याची किंमत ९४ करोड ६८ लाख रुपये इतकी आहे.
अवश्य वाचा : यश शाहची तिसऱ्यांदा खेलो इंडिया व ऑल इंडिया बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड
व्हेरिफाय व पेपर्सची ऑथेंटिसिटी चेक करत असल्याची माहिती (Police)
याबाबत माहिती मिळतात पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. हा माल एचडीएफसी बँकेचा असल्याची माहिती असून पोलिस व्हेरिफाय व पेपर्सची ऑथेंटिसिटी चेक करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी दिली.