Police : नगर : तोफखाना पोलीस (Police) ठाणे हद्दीत दोन ठिकाणी चोरी (Theft) व घरफोडीच्या (Burglary) घटना घडल्या आहेत. टेम्पोतून सुमारे ५० हजाराचे औषधाचे बॉक्स चोरून नेले तर घरफोडी करून रोकड, दागिने व मौल्यवान वस्तू असा ३५ हजाराचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे (Crime) दाखल झाले आहेत.
अवश्य वाचा : अवैध दारू विरोधात महिला आक्रमक; दुकान पेटवले
टेम्पोवरील ताडपत्री फाडून ५ बॉक्सची चोरी
वेलू दुरास्वामी स्वामी (वय ४० रा. कर्नाटक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेलू हे एका ट्रान्सपोर्ट कंपनीसाठी ड्रायव्हर म्हणून काम करतात. गुजरातमधील एका कंपनीमधून औषधांनी भरलेला माल घेऊन ते बंगलोरकडे जात होते. रात्री साडेसात वाजता ते कल्याण बायपासवरील समाधान हॉटेलजवळ थांबले होते. जेवण व आरामानंतर रात्री नऊ वाजता त्यांनी पुन्हा प्रवास सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या वेळी त्यांनी टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोवरील ताडपत्री फाटलेली दिसली आणि त्यामधील ५ बॉक्स चोरीला गेलेले होते.
नक्की वाचा : ‘एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी’-रोहित पवार
४९ हजार ६३५ रूपये किंमतीचा ऐवज चोरीला (Police)
एकूण किंमत ४९ हजार ६३५ रूपये किंमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. अमीन शमशुद्दीन शेख (वय ५९, रा. भूतकरवाडी, महेश कॉलनी, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी १ डिसेंबर रोजी दुपारी पावणे तीन ते संध्याकाळी सहाच्या दरम्यान शेख यांचे घर फोडले. चोरट्याने घराच्या मागील दरवाजाचा खालचा भाग कट करून घरात प्रवेश केला आणि 13 हजाराची रोकड, सोन्याच्या अंगठ्या, कानातील रिंग आणि इतर मौल्यवान दागिने असा एकूण 35 हजाराचा ऐवज लंपास केला.