Police : झेंडीगेटच्या कत्तलखान्यावर छापा; आठ लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Police : झेंडीगेटच्या कत्तलखान्यावर छापा; आठ लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

0
Police : झेंडीगेटच्या कत्तलखान्यावर छापा; आठ लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
Police : झेंडीगेटच्या कत्तलखान्यावर छापा; आठ लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Police : नगर : शहरातील झेंडीगेट परिसरातील कत्तलखान्यावर छापा टाकून ८ लाख १० हजारांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने हस्तगत केला आहे. तसेच याप्रकरणी तिघांविरूध्द कोतवाली पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : साखर कारखानदार व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक निष्फळ

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अंमलदार संदीप पवार, पंकज व्यवहारे, विजय ठोंबरे, संतोष खैरे, रविंद्र घुंगासे, शिवाजी ढाकणे, आकाश काळे यांचे पथक तयार करून त्यांना अवैध व्यवसायावर कारवाई च्या सूचना दिल्या होत्या.

कत्तलसाठी जनावरे ठेवले होते डांबुन (Police)

त्यानुसार पथकाने शहरातील बाबा बंगाली चौकीजवळील सरकारी शौचालयाचे शेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्यासाठी डांबुन ठेवलेले आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार छापा टाकून गोवंश जातीची जिवंत जनावरे निर्दयतेने बांधुन ठेवलेली मिळून आली. त्यानुसार फैजान इद्रिस कुरेशी, सुफियान उर्फ गुल्लु इद्रिस कुरेशी, शोएब अब्दुल रऊफ कुरेशी, (सर्व रा.झेंडीगेट, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.