Police : नगर : सोशल मीडियाचा (Social media) वापर करून पळवून नेलेल्या नगर शहरातील दोन मुलींना कोतवाली पोलिसांनी (Police) परत आणले आहे. यातील एका मुलीला मराठवाड्यातून तर दुसऱ्या मुलीला बिहारमधून परत आणण्यात आले आहे. या मुलींना फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपींनाही (accused) ताब्यात घेण्यात आले आहे.
हे देखील वाचा : कालव्यांची कामे रखडवून कोणती ‘निर्मिती’ साध्य करायची होती : राधाकृष्ण विखे पाटील
नगर शहरातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या दोन मुली सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवर अनोळखी तरुणांशी ओळख करून घरातून निघून गेल्या. पालकांनी शोधाशोध केली मात्र उपयोग झाला नाही. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिल्या. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनातून कोतवाली पोलिसांनी एका मुलीला बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमारेषेवरून आणले आणि काही दिवस पाहुण्यांकडे नगर मध्ये आली आणि निघून गेलेल्या दुसऱ्या मुलीला मराठवाड्यातून आणले. जेंव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले तेंव्हा त्यांनी खूप मोठी चूक केली असल्याचे त्यांनी सांगितले. तपास लावल्यानंतर मुलींच्या परिसरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान विश्वास गाजरे, रवी टकले, प्रमोद लहारे, सचिन लोळगे यांचा सत्कार केला.
अवश्य वाचा : कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी प्रशासनाची बैठक
‘आपण एक टिकलीचे पाकीट घ्यायचे असेल तर दहा ते बारा पाकीट चाळून पाहतो, चप्पल ड्रेस किंवा काहीही घ्यायचं म्हटलं तरी चार ते पाच दुकानात जाऊन पाहतो मग, आपण आयुष्याचा जोडीदार निवडताना किती काळजी घ्यायला पाहिजे? त्यामुळे मुलींनी अधिकची काळजी घ्यायला हवी. पालकांनी आपल्या पाल्यांवर कायम लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक विषयाबाबत वेळोवेळी संवाद साधावेत. पालकांचे आपल्या पाल्याची मैत्रीपूर्ण संबंध असावेत. मुलांमध्ये फक्त भीती नको तर, आदरयुक्त भीती असावी. पालकांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे.’