Police : कर्जत : विना क्रमांक, फॅन्सी नंबरप्लेट आदी नियम (Rules) मोडणाऱ्या वाहनचालकांवर कर्जत पोलिसांनी (Police) कारवाई केली. नाकाबंदी मोहिमेत पोलिसांनी ५९ वाहनांची तपासणी करत ४२ हजार ५०० रुपयांचा दंड (Penalty) वसूल केला.
अवश्य वाचा : भरदिवसा ट्रक चालकाचा गळा कापला; दोघे आरोपी जेरबंद
विना क्रमांक, विना कागदपत्रे एकूण ५९ वाहने ताब्यात घेतली
कर्जत पोलीस विभागाच्यावतीने पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव आणि सहायक पोलीस निरीक्षक रमीज मुलाणी यांनी अचानक शहरातील महात्मा फुले चौकात वाहन-चालकांची तपासणी मोहीम हाती घेतली. यामध्ये विना क्रमांक, विना कागदपत्रे एकूण ५९ वाहने ताब्यात घेतली. तर विनापरवाना यासह नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यात आला. गुरुवारी (ता.१३) सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, सहायक पोलीस निरीक्षक रमीज मुलाणी यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह होमगार्डचे जवान यांच्या साथीने शहरातील महात्मा फुले चौकात वाहन-चालकांसाठी नाकाबंदी मोहीम राबवली. यामध्ये विना क्रमांक आणि कागदपत्रे नसलेली तब्बल ५९ वाहने मिळून आली. यापैकी ४५ वाहनांच्या कागदपत्रांची शहानिशा आणि खात्री करीत सोडण्यात आली. तर उर्वरित वाहनांची कागदपत्रांची पूर्ण शहानिशा पूर्ण होईपर्यंत सदरची वाहने कर्जत पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.

नक्की वाचा : भारताला मोठा धक्का!जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर
चालकांकडून एकूण ४२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल (Police)
या नाकाबंदी मोहिमे दरम्यान एकूण ४७ वाहन चालकांकडून एकूण ४२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अचानक सुरू केलेल्या नाकाबंदी मोहिमेमुळे अनेक वाहनचालकांनी आपला मोर्चा इतर मार्गाने वळविला. मात्र, या मोहिमेचे सर्वसामान्य कर्जतकरांनी कौतुक केले. कर्जत शहरात अल्पवयीन मुले दुचाकी आणि चारचाकी वाहने चालविताना निदर्शनास येतात. यासह शाळा-विद्यालयाच्या परिसरात अनेक तरुण विनाकारण शाळा भरताना आणि सुटताना भरधाव वेगाने गाडया चालवणे, विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या जमावात गाडी घुसविणे, महत्वाच्या ठिकाणी गाड्या आडव्या लावत जमावाने उभे राहणे, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, मोठ्या आवाजातील सायलंसर लावत गाड्या पळविणे यासारखे प्रकार घडत आहे. याकडे देखील पोलीस प्रशासनाने लक्ष देत उचित कार्यवाही करण्याची मागणी शिक्षक, पालक, सामजिक कार्यकर्ते आणि परिसरातील व्यापारी बांधवांकडून पुढे येत आहे.