Police : तलवार घेऊन दहशत करणारे १२ आरोपी जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

Police : तलवार घेऊन दहशत करणारे १२ आरोपी जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

0
Police : तलवार घेऊन दहशत करणारे १२ आरोपी जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
Police : तलवार घेऊन दहशत करणारे १२ आरोपी जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

Police : नगर : गेल्या दोन दिवसापूर्वी निंबळक हददीत तलवार, कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडके घेऊन दहशत (Terror) करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे १२ संशयित आरोपी (Accused) सावेडी, बोल्हेगाव परिसरातून एमआयडीसी पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. हे आरोपी सराईत गुन्हेगार (Criminal) असून त्यांच्यावर तोफखाना, एमआयडीसी, कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात पुढे आले आहे. .

अवश्य वाचा : भारत-न्युझीलँड यांच्यात होणार अंतिम सामना; दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे

संतोष रघुनाथ धोत्रे (वय २७, रा. चैतन्य हॉटेल पाठीमागे, नागापूर), अजय सोमनाथ गुळवे (वय २६, रा. लामखेडे पेट्रोलपंप शेजारी, एमआयडीसी), अमोल गोरख आव्हाड (वय-२३, रा आदर्श कॉलनी बोल्हेगाव), विशाल भाऊसाहेब पाटोळे (वय-२३ रा. बोल्हेगाव), सुधिर प्रदीप दळवी (वय २४, रा. नागापूर), राहुल नाथा गोरे (वय ३५, रा नागापूर), तुषार लहानु पानसरे (वय १९, रा वडगाव गुप्ता), अक्षय बाळासाहेब ठुबे (वय-२१ रा. आंबेडकर चौक एमआयडीसी), यश सुनिल सरोदे रा. नागापूर), सुरज अरविंद भिंगारदिवे (रा. नागापूर), करण गौतम अवताडे (वय-२१ रा. बोल्हेगाव), शरद जगन पाटोळ (वय-१९ रा.नागापूर ता.जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

नक्की वाचा : स्वारगेट अत्याचार प्रकरण;आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांच्या गणवेशातील फोटो आला समोर

सापळा रचून १२ आरोपींच्या आवळल्या मुसक्या (Police)

याबाबत राजेंद्र पोपट कोतकर (वय ४१, रा. कोतकरवस्ती, निंबळक ता जि अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा समांतर तपास करत असता एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार निंबळक परिसरात तलवार घेऊन दहशत करणारे सावेडी परिसरात तसेच बोल्हेगाव परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून १२ आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक विनोद परदेशी, मनोज मोंढे, विकास जाधव, देविदास भालेराव, नितीन उगलमुगले, साबीर शेख, राजेंद्र सुद्रीक, नंदकिशोर सांगळे, गणेश चौधरी, साईनाथ टेमकर, कावरे, संदीप चव्हाण, संदीप पितळे, म्हस्के, विशाल थोरात, संतोष नेहुल, मुकुंद दुधाळ, महेश बोरुडे, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, सूरज देशमुख, राजेश राठोड, जयसिंग शिंदे, सुरेश सानप, उमेश शेरकर, भगवान वंजारी यांच्या पथकाने केली.