Police : अकोले : घरासमोर, बाजारात किंवा इतर ठिकाणी उभ्या केलेल्या दुचाकी संधी साधून चोरट्यांनी (Thief) पळवल्या. त्यांचा शोध अकोले पोलिसांनी घेतला असता अवघ्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात दुचाकी (Two Wheeler) मिळाल्या आहेत. यात काही दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत. ज्यांच्या या दुचाकी आहेत, त्यांनी कागदपत्रे दाखवून पोलीस (Police) ठाण्यामधून घेऊन जाव्यात, असे आवाहन पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी केले आहे.
नक्की वाचा : चालकाच्या रागामुळे चार निष्पापांचा गेला बळी
लॉक तोडण्याची आयडिया असल्याने काही सेकंदांत वाहन लंपास
अकोलेसह सभोवतालच्या तालुक्यात सध्या मोटारसायकल व चारचाकी वाहन चोरीचे प्रमाण वाढले आहे. यात दुचाकींचे प्रमाण अधिक आहे. हँडल लॉक करून खरेदी किंवा इतर कामे करण्यासाठी वाहनधारक जातात. हीच संधी साधून चोरटे लॉक तोडून दुचाकी पळवितात. लॉक तोडण्याची आयडिया असल्याने अवघ्या काही सेकंदांत ते वाहन लंपास करतात.
अवश्य वाचा : यंदाच्या वर्षी फक्त पहिलीच्या वर्गालाच सीबीएससी : दादा भुसे
ओतूर, पुणे, संगमनेर, घोटी परिसरातून चोरीच्या गाड्या हस्तगत (Police)
या वाहनांची विक्री करून चोरटे गांजा, दारू आदी गरजा पूर्ण करत आहेत. परंतु मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांकडून तपासाला गती दिली जाते. सीसीटीव्ही फूटेज, खबर्या आदिंच्या मदतीने ते चोरट्यांपर्यंत पोहोचतात. गेल्या वर्षभरामध्ये अकोले पोलिसांनी ओतूर, पुणे, संगमनेर, घोटी परिसरातून चोरीच्या गाड्या हस्तगत करत चोरट्यांना गजाआड केले होते. तसेच अकोले पोलीस ठाण्याच्या प्रांगणात बेवारस आढळलेली वाहने लावण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी कागदपत्रे दाखवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेऊन जावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, महिला पोलीस काॅन्स्टेबल अनिता खताळ व सुहास गोरे यांनी केले आहे.