Police : 2 गावठी कट्टे, 8 जिवंत काडतुसे, 4 मॅग्झीनसह 8 आरोपी जेरबंद; शेवगाव पोलिसांची कारवाई

Police : 2 गावठी कट्टे, 8 जिवंत काडतुसे, 4 मॅग्झीनसह 8 आरोपी जेरबंद; शेवगाव पोलिसांची कारवाई

0
Police : 2 गावठी कट्टे, 8 जिवंत काडतुसे, 4 मॅग्झीनसह 8 आरोपी जेरबंद; शेवगाव पोलिसांची कारवाई
Police : 2 गावठी कट्टे, 8 जिवंत काडतुसे, 4 मॅग्झीनसह 8 आरोपी जेरबंद; शेवगाव पोलिसांची कारवाई

Police : नगर : शेवगाव पोलीस ठाणे हददीत दोन गावठी कट्टे (Gun), आठ जिवंत काडतुसे व चार मॅग्झीन बाळगणारे आठ संशयित आरोपी (Accused) शेवगाव पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ११ मोबाईल असा एकूण १३ लाख ३५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत कारण्यात आला आहे.

नक्की वाचा : लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली नवी माहिती

संशयित आरोपींची नावे

अंकुश महादेव धोत्रे (वय २४, रा. बोरगाव ता. जि. अहिल्यानगर), शेख आकिब जलील (वय २७ रा. मुकुंद नगर), सुलतान अहमद शेख (वय ४७ रा. गोविंदपुरा अहिल्यानगर), दीपक ज्ञानेश्वर गायकवाड (वय २५ रा. शिवाजीनगर कल्याण रोड), मुक्तार सय्यद सिकंदर (वय ४० रा. अहिल्यानगर), पापाभाई शब्बीर बागवान (वय २७ श्रीरामपूर), सोहेल जावेद कुरेशी (वय २२ रा.फातेमा हाऊसींग सोसायटी श्रीरामपूर), आवेज जुबेर शेख (वय २८ रा.मिल्लतनगर, श्रीरामपूर), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

अवश्य वाचा : “मराठी गया तेल लगाने”, असे म्हणणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांनी चांगलीच घडवली अद्दल

तब्बल १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत (Police)

शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांना मिळालेल्या माहितीनुसार पैठण येथून शेवगावडे दोन चारचाकी वाहनातून गावठी बनावटीचे कट्टे व काडतुसे घेऊन येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने शेवगावातील क्रांती चौकात नाकाबंदी करून आठ आरोपी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, अशोक काटे, पोलीस नाईक आदिनाथ वामन, शाम गुंजाळ, राहुल खेडकर, राहुल आठरे, संभाजी धायतडक, प्रशांत आंधळे, आबासाहेब गोरे, देविदास वाघमारे व होमगार्ड अमोल काळे, रवी बोधले यांच्या पथकाने केली.