Police : नगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) व आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पोलीस (Police) प्रशासनाला चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक झाली. १५ दिवसांत वाहतूक कोंडीची (Traffic Jam) समस्या सोडविली जाईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनातर्फे शिष्टमंडळाला दिले.
नक्की वाचा : संजय शिरसाट यांच्या मुलावर विवाहित महिलेचे गंभीर आरोप
पोलीस निरीक्षक प्रताप दराडे म्हणाले की,
यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे म्हणाले की, शहरातील नागरिकांनी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करावे तसेच कानेटिक चौक, केडगाव वेस, माळीवाडा बस स्टॅन्ड, मार्केट यार्ड, सक्कर चौक, कोठला स्टॅन्ड, प्रोफेसर कॉलनी चौक, दिल्ली गेट, प्रेमदान चौक, भिंस्तबाग चौक परिसरामध्ये नियमित वाहतूक पोलीस ठेवले जातील. तसेच अवैद्य वाहतूक प्रवासी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. एसटी स्टँड परिसरातील ट्रॅव्हल थांबा बंद केला जाईल. शहरातील पॅगो रिक्षाला देखील शिस्त लावली जाईल. या कामासाठी महापालिकेने देखील सहकार्य करण्याची गरज आहे. रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत पालिकेने कठोर कारवाई केली पाहिजे, पोलीस प्रशासन नागरिकांच्या सहकार्यातून नक्कीच वाहतुकीची शिस्त लावेल, असे त्यांनी सांगितले.
अवश्य वाचा : मुंबईनंतर पुणे व सोलापूर मध्ये मान्सूनची एन्ट्री!
आदी उपस्थित (Police)
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बोरसे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, सुरेश बनसोडे, नितीन घोडके, वैभव ढाकणे, जॉय लोखंडे, दीपक खेडकर आदी उपस्थित होते.