Police : नगर : अहिल्यानगर शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल (Cow Slaughter) करून गोमांस विक्री करणाऱ्या टोळीला एका वर्षा करिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (Police Inspector) प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी (Police) केली.
नक्की वाचा : आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोलमाफी;एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
कारवाईमुळे गुन्हेगारांवर बसणार वचक
ओवेसी रशीद शेख (रा.आंबेडकर चौक, झेंडीगेट, अहिल्यानगर), शोएब रौफ कुरेशी (रा.कारी मस्जिद जवळ बाबा बंगाली, अहिल्यानगर), फैसल अस्लम शेख (रा. झेंडीगेट, अहिल्यानगर), मुसावीर युनूस कुरेशी (रा. झेंडीगेट, अहिल्यानगर), या टोळीला जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे. अहिल्यानगर शहरात अवैध गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्यांवर तसेच मांस विक्री करण्यावर कोतवाली पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावला आहे. अशा गुन्हेगारांवर चपराक बसावी यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून गोमांस विक्री करणाऱ्या टोळीवर हद्दपारीची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे काहीसा प्रमाणात गुन्हेगारांवर वचक बसणार आहे.
अवश्य वाचा : अरेच्चा! सरकारच्या २६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी
यांच्या पथकाची कारवाई (Police)
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस संदीप पितळे, रोहिणी दरंदले, शिल्पा कांबळे, दीपक रोहकले, तानाजी पवार, सूरज कदम, सचिन लोळगे, राम हंडाळ, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, महेश पवार, सोमनाथ राऊत, राहुल मासाळकर, प्रतिभा नागरे, राहुल गुड्डू यांच्या पथकाने केले.