Police : भंडारदऱ्यात ‌‘थर्टी फर्स्ट’ला पोलिसांचा कडक बंदोबस्त

0
Police : भंडारदऱ्यात ‌‘थर्टी फर्स्ट'ला पोलिसांचा कडक बंदोबस्त
Police : भंडारदऱ्यात ‌‘थर्टी फर्स्ट'ला पोलिसांचा कडक बंदोबस्त

Police : अकोले : निसर्गाचं वरदान लाभलेल्या भंडारदरा (Bhandardara) (ता.अकोले) येथे नववर्षाच्या (New year) स्वागतासाठी  होणाऱ्या संभाव्य गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी थर्टी फर्स्टला राजूर पोलिसांचा (Police) चोख बंदोबस्त असणार आहे. यावेळी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, असे संकेत पोलिसांनी वन विभागासह (Forest Department) भंडारदरा येथे झालेल्या बैठकीत दिले.

हे देखील वाचा : अखेर मराठा आंदोलनाची दिशा ठरली; २० जानेवारीपासून मनाेज जरांगेंचं मुंबईत आमरण उपाेषण


 अकोले तालुक्यातील भंडारदरा हे महत्वाचे निसर्ग पर्यटनस्थळ असून नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. यावर्षी सुद्धा सरत्या वर्षाला पर्यटकांचा महापूर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गर्दीवर अंकुश ठेवण्यासाठी राजूरचे  पोलीस उपनिरीक्षक शेख व सहायक वनसंरक्षक अधिकारी अमोल आडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. भंडारदऱ्याचे कापडी तंबूचे कॅम्पिंग पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत असते. मात्र टेंटधारकांनी तंबूमध्ये वास्तव्यास येणाऱ्या पर्यटकांची नोंद घेणे महत्वाचे असल्याने त्यांचे ओळखपत्र, संपर्क क्रमांक, वाहन क्रमांक घेणे आदी नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

नक्की वाचा : देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल; इंडिया आघाडीच्या भाजप हटाव…देश बचावच्या घाेषणा


टेंट परिसरात रात्री अकरा वाजेनंतर संगीत वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. रोजगार निर्मितीस प्राधान्य देत कॅम्पिंगसाठी नियमांत राहून व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. प्रत्येक पर्यटकास तंबूमध्ये वास्तव्यासाठी योग्य दर घेऊन प्रवेश द्यावा, असेही सूचित केले आहे. विशेष म्हणजे राजूर पोलिसांकडून वारंघुशी फाटा, रंधा धबधबा, वाकी फाटा व राजूर येथे पर्यटकांसाठी तपासणी नाके उभारण्यात येणार असून मद्य व अंमली पदार्थ साठा आढळल्यास कायदेशीर कारवाई करून साठा जप्त करण्यात येणार आहे. वन विभागाच्यावतीनेही टेंटधारकासाठी महत्वपूर्ण सूचना दिल्या असून पर्यटकांसाठी शेकोटी करताना टेंटधारकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. तसेच पर्यटकांना रात्रीच्या वेळेस जंगलात फिरु देऊ नये. जर नियमांचे उल्लंघन केले तर कायदेशीर कारवाईचा इशारा दोन्ही विभागांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here