Police : संगमनेर : शहरातील अकोले नाका व परिसरात नागरिकांना मारहाण करुन लुटमारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस (Police) पथकाने लुटमार करणाऱ्या दोन टोळ्या जेरबंद (Arrested) केल्या आहेत. त्यांच्याकडून १ लाख ५५ हजार १५० रुपयांच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या कारवाईचे (Action) संगमनेरकरांनी कौतुक केले आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर शहरातील अकोले नाका व परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची काही गुंड प्रवृत्तीचे इसम दिवसा ढवळ्या लुटमार करत होते. ह्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत चालली होती.
नक्की वाचा : ‘देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत’,ठाण्यातील बॅनरची राज्यभर चर्चा
या सात जणांना अटक
अखेर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी या गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस पथकाची नेमणूक केली आणि त्यांनी साई शरद सुर्यवंशी (वय २०), राहुल भरत सोनवणे (वय २४), आदित्य संपत सुर्यवंशी (वय २७, तिघे रा. अकोले नाका, संगमनेर ता.संगमनेर, जि. अहिल्यानगर), पिल्या उर्फ विक्रम रामनाथ घोडेकर (वय २७ रा. पंपिंग स्टेशन, ता संगमनेर, जि. अहिल्यानगर), सिध्दार्थ दीपक मावस (वय २२, रा. अरगडे गल्ली, खांडगाव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), प्रशांत उर्फ परशा दिपक मावस (वय १९, रा. अरगडे गल्ली, खांडगाव, ता.संगमनेर जि. अहिल्यानगर), सौरभ पप्पू खर्डे (वय १९, रा. गणेशवाडी, खांडगाव, ता.संगमनेर, जि. अहिल्यानगर) या सात जणांना अटक केली.
अवश्य वाचा : ‘दिवा विझताना मोठा होतो,तसं जयंत पाटलांचं झालंय’- गोपीचंद पडळकर
विविध गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस (Police)
त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा असे विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या उघडकीस आले आहे. यामध्ये त्यांच्याकडून दरोडा टाकून व गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. यामध्ये १० हजार रुपये किंमतीचे चांदीचे मुख व पाठीमागुन पितळी मुलामा असलेले देव चार नग, ४ हजार रुपये किंमतीचे पितळी दिवटे, ताम्हण, तांब्या, ताट असे पुजेचे साहित्य, एक चाकू, ६० हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी, २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल, ६५० रोख रक्कम, १५०० रुपयांच्या नोटा, एक चॉपर व चार काठ्या असा एकूण १ लाख ५५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, संगमनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, संतोष पगारे, पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे, आत्माराम पवार, संदिप शिरसाठ, अजित कुऱ्हे, संतोष बाचकर, सुरेश मोरे, अतुल उंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकातील पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी केली आहे.