Police : नगर : जिल्हा पोलीस अधीक्षक (District Superintendent of Police) यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने जिल्हयात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाईचा धडाका लावला आहे. राज्यात बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थाची विक्री व मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून तीन लाख ९८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत शेवगाव पोलीस (Police) ठाण्यात पाच संशयित आरोपींविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : बापरे! कोल्हापूरातील धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे
खालील नबिब शहा, अल्ताफ पठाण (दोघे रा. नाईकवाडी मोहल्ला शेवगाव), कुणाल संजय पिसाळ (भगतसिंग चौक, शेवगाव ), शाहबाज ताहेर खान पठाण, आफताब ताहेरखान पठाण (रा. शेवगाव), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. विशेष पथकातील पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना मिळालेल्या माहितीनुसार शेवगाव शहरात नाईकवाडी मोहल्ला परिसरात अवैध सुगंधी तंबाखू, मावा तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी (ता.१७) मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत तीन लाख ९८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. प्रशांत आंधळे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : निराधार बालकांना आधार कार्ड मिळणार
यांच्या पथकाने केली कारवाई (Police)
ही कारवाई पोलीस अंमलदार अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, शंकर चौधरी, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, उमेश खेडकर, सुनील पवार, अमोल कांबळे, अक्षय भोसले, सुनील दिघे, आकाश चव्हाण यांच्या पथकाने केली.