Police : नगर : जिल्ह्यात पोलीस (Police) प्रशासनाने अवैध धंद्यावर (Illegal Business) कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने पाथर्डी तालुक्यात चिंचपूर इजदे परिसरात गॅस (Gas) गोडाऊन फोडणाऱ्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले असून एक आरोपी धाराशीव येथून ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून तब्बल १३० गॅसच्या टाक्या, असा एकूण पाच लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा : करंजी घाटात विचित्र अपघात; ट्रकची एकाच वेळी पाच वाहनांना धडक, दोघे गंभीर जखमी
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव
राजेंद्र गुलाब काळे (वय ४२, रा.कासार खानी, ता.वाशी, जि.धाराशीव), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा सुंदर शंकर शिंदे (रा.दसमेगाव, ता.वाशी, जि.धाराशीव), रामा सुबराव काळे, गुलाब गुंपूर काळे, सुनील लगमण पवार, दत्ता लगमण पवार, लगमण भिसराम पवार, शंकर सुरेश काळे (सर्व पसार), यांच्यासोबत केला असल्याची पोलीस तपासात समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी तालुक्यातील गॅस गोडाऊन फोडणारी टोळी धाराशीव येथील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.
अवश्य वाचा : अनधिकृत खतांच्या साठ्यावर कृषी विभागाचा छापा
यांच्या पथकाने केली कारवाई (Police)
ही कारवाई पथकातील दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, सुरेश माळी, मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश लोंढे, संतोष लोढे, गणेश धोत्रे, अरूण गांगुर्डे, फुरकान शेख, हृदय घोडके, सोमनाथ झांबरे, विजय ठोंबरे, किशोर शिरसाठ, बाळसाहेब गुंजाळ, रोहित येमुल, रमिझराजा आत्तार, सुनील मालणकर, भगवान थोरात, आकाश काळे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, जालिंदर माने, बाळसाहेब खेडकर, प्रशांत राठोड, सागर ससाणे, भाग्यश्री भिटे, सारिका दरेकर, महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर, भगवान धुळे व अरूण मोरे यांच्या पथकाने केली.