Police : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील कोतवाली पोलीस ठाणे (Police Station) हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी (Police) छापा टाकून नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सहा लाख सात हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप यांच्या जीवितास धोका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पोलीस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे
अक्षय सुनील गोरे (वय ३०,रा. भूषणनगर केडगाव), अमोल बाबू शेख (वय २४), मयूर देविदास गहिले (वय ३०), प्रतीक अनिल महारपुडे (वय २६, रा. सोनेवाडी), ज्ञानदेव रामचंद्र जाधव (वय ४३), गणेश सुरेश शेळके (वय ३९), ज्ञानेश्वर भगनान मिसाळ (वय ३५), बाबासाहेब नामदेव गायकवाड (वय ५८, सर्व रा. केडगाव), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या माहितीनुसार केडगाव लिंक रोड परिसरात जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकला. या कारवाई नऊ आरोपी ताब्यात घेतले आहेत. त्यांच्याकडून सहा लाख सात हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : अमराठी व्यावसायिकांची मनसेविरोधात एकजूट, मीरा भाईंदरमध्ये मारहाणीवरुन आक्रमक
यांच्या पथकाने केली कारवाई (Police)
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक कृष्णकुमार बेसवाड, पोलीस कॉन्स्टेबल बाळकृष्ण दौंड, विशाल दळवी, सलीम शेख, विनोद बोरगे, विक्रम वाघमारे, सूर्यकांत डोके, सत्यजित शिंदे, अमोल गाडे, अतुल काजळे, सोमनाथ केकान, महेश पवार, शिरीष तरटे, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, प्रतिभा नांगरे यांच्या पथकाने केली.