Police : कर्जत: पोलीस (Police) उपअधीक्षक संतोष खाडे (Santosh Khade) यांच्या पथकाने राशीन (ता.कर्जत) येथे अवैध गुटखा (Illegal Gutkha) साठेबाजीवर छापा टाकून ५ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणात एकूण तीन आरोपींना (Accused) अटक करण्यात आली आहे.
नक्की वाचा : कोतवाली पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा
विक्री आणि वाहतूक होत असल्याची माहिती
पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना राशीन (ता.कर्जत) येथे अवैध सुगंधी पानमसाला, गुटखा आणि तंबाखू यांची साठेबाजी होत असून इतर ठिकाणी त्याची विक्री आणि वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपअधीक्षक खाडे शनिवारी (ता.५) सकाळी १० वाजता राशीन येथे छापा मारला असता १ लाख ५४ हजार रुपयांची सुगंधी तंबाखू मिळून आली तर वाहतूक करणारी ४ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ५ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अवश्य वाचा : आता ‘या’ राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास स्वस्त होणार;सरकारची घोषणा
एलसीबी आणि कर्जत पोलीसांची संयुक्त कारवाई (Police)
या प्रकरणात अमर कांबळे (राशीन), भाऊसाहेब सकुंडे आणि संभाजी सरक (दोघे रा. भिगवण जिल्हा पुणे) यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्यासह अहिल्यानगर एलसीबी आणि कर्जत पोलीस पथक यांनी सदरची कारवाई संयुक्तपणे पार पाडली.