Police : नगर : पाथर्डी तालुक्यात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाने (Special Police Squad) छापा टाकून १० संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरुद्ध पाथर्डी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला असून, त्यांच्याकडून तब्बल ११ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
नक्की वाचा : धुळ्यात राडा;माणिकराव कोकाटेंच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे
संशयित आरोपींची नावे
असीर छोटू पठाण (वय-४०, रा.माणिकदौंडी, ता. पाथर्डी), कलीम नूर मोहम्मद शेख (वय ५१, रा. कोरडगाव), गणेश विष्णू पवळे (वय-४२, रा. पाथर्डी), सोमनाथ रावसाहेब चितळे (वय. ३८, रा. चितळे), फिरोज इम्रान पठाण (वय ४२. रा. पाथर्डी), जुबेर अफसर अली सय्यद (वय-३०, रा. माणिकदौंडी), अशोक भगवान दहिफळे (वय ४३,रा. मोहटा ता. पाथर्डी), शाकीर उस्मान पठाण (वय-४८ रा. मानोर, बीड), सलमान कलीम शेख (वय-२६ रा. कोरडगाव), अंबादास बन्सी चितळे (वय ४०, रा. चितळवाडी, ता. पाथर्डी), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
अवश्य वाचा : कर्जत तालुका प्रशासनाने राशीन प्रकरणात सर्वसमावेशक तोडगा काढला
विशेष पोलीस पथकाची कारवाई (Police)
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थापना केलेल्या विशेष पोलीस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार माणिकदौंडी परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्ड्या सुरु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकला असता १० आरोपी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ११ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार शंकर चौधरी, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, अजय साठे, सुनील पवार, उमेश खेडकर, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, सुनील दिघे, अमोल कांबळे, संभाजी बोराडे, विजय ढाकणे, दीपक जाधव, जालिंदर दहिफळे यांच्या यांच्या पथकाने केली.