Police : अल्पवयीन मुलींना पाहून अश्लील चाळे करणारा जेरबंद; तोफखाना पोलिसांची कारवाई

Police : अल्पवयीन मुलींना पाहून अश्लील चाळे करणारा जेरबंद; तोफखाना पोलिसांची कारवाई

0
Police : अल्पवयीन मुलींना पाहून अश्लील चाळे करणारा जेरबंद; तोफखाना पोलिसांची कारवाई
Police : अल्पवयीन मुलींना पाहून अश्लील चाळे करणारा जेरबंद; तोफखाना पोलिसांची कारवाई

Police : नगर : सावेडी उपनगरातील अल्पवयीन मुलींना (Minor Girl) पाहून अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला तोफखाना पोलीस (Police) पोलिसांनी एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतला आहे. योगेश सिताराम खोटे, (वय-३३,रा.साहिल हौसिंग सोसायटी,निलगीरी पार्क, तांबटकर मळा,ता.जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. २९) सायंकाळच्या सुमारास सावेडी उपनगरात घडली.

अवश्य वाचा : रेव्ह पार्टी म्हणजे काय?आरोप सिद्ध झाल्यास काय होते शिक्षा?

तत्काळ आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना

फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुली खेळत असताना त्या ठिकाणी लाल काळ्या रंगाची मोटारसायकलवर आला. गाडीवरून उतरून अश्लील हावभाव केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी तत्काळ आरोपीचा शोध घेऊन ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या.

नक्की वाचा : अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; सहा महिन्यांत ८९५ गुन्हे दाखल

आरोपी एमआयडीसी परिसरातून ताब्यात (Police)

पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फूटेज मधील आरोपीचा शोध घेऊन आरोपी एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार भानुदास खेडकर, सुमित गवळी, अविनाश बर्डे, सतीश त्रिभूवन, भागवत बांगर यांनी केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला हे करत आहेत.